नाशिक जिल्हा झाला केरोसिनमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:50 PM2020-10-11T23:50:53+5:302020-10-12T01:20:41+5:30
नाशिक: गॅस जोडणी नसल्यामुळे चूल वापरणाऱ्या कुटूंबांना अनुदानित कॅरोसिनचा पुरवठा केला जात होता. तथापी राज्य शासनाच्या ‘चूल मुक्त Ñ आणि धूर मुक्त महाराष्टÑ’ या उपक्रमांतर्गत गॅस नसलेल्या कुटूंबियांना गॅस जोडणी देऊन जिल्हा केरोसीन मुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
नाशिक: गॅस जोडणी नसल्यामुळे चूल वापरणाऱ्या कुटूंबांना अनुदानित कॅरोसिनचा पुरवठा केला जात होता. तथापी राज्य शासनाच्या ‘चूल मुक्त Ñ आणि धूर मुक्त महाराष्टÑ’ या उपक्रमांतर्गत गॅस नसलेल्या कुटूंबियांना गॅस जोडणी देऊन जिल्हा केरोसीन मुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
राज्यातील ज्या कुटुंबाकडे स्वयंपाकाचा गॅस नाही अशा कुटूंबियांना चुलीसाठी केरोसीनचा पुरवठा बंद करून त्यांना उज्वला योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅसचे वितरण करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्'ाला गॅस जोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पुरवठा विभागाने केलेल्या कामगिरीनुसार जिल्'ातील सर्व १५ तालुके तसेच दोन धान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रे सप्टेबर अखेर केरोसीन मुक्त झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्'ात गॅस जोडणी नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचा पुरवठा केला जात होता. २४ जुलै २०१९ मध्य राज्य सरकारने ‘चूल मुक्त, धूर मुक्त महाराष्ट्र’ योजनेची घोषणा केली. त्यानुसार ज्या ग्राहकांना अजूनही गॅस जोडणी नाही त्यांना उज्वला मोहिमेंतर्गत गॅस जोडणी देण्याची कार्यवाही करण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने जून अखेर येवला, चांदवड, मालेगाव, बागलाण, इगतपुरी, नांदगाव, दिंडोरी, कळवण ,नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, देवळा असे १३ तालुके केरोसीन मुक्त करण्यात आले होते. डिसेंबर अखेर सुरगाणा व पेठ असे दोन तालुक्यांमध्येही गॅस जोडरी आल्याने जिल्'ातील मालेगाव क्षेत्र वगळता सर्व तालुके हे केरोसीन मुक्त झाले होते.
मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने काही भागात मोहिम राबविण्याबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या आॅगस्ट महिन्यापर्यंत त्या ठिकाणी अनुदानित केरोसीनचा पुरवठा करण्यात येत होता. सप्टेबर अखेर मालेगाव येथील धान्य वितरण अधिकारी यांचा केरोसीनची कोटा निरंक झाल्यामुळे संबंधित क्षेत्र देखील केरोसीन मुक्त झाले आहे. असल्याचा दावा पुरवठा विभागाने केला आहे. जिल्'ोतील सप्टेबर अखेरची आकडेवारी पाहाता पंधरा तालुके आणि दोन धान्य वितरण अधिकारी यांचय कार्यक्षेत्रात गॅस जोडणी देण्यात आल्याने जिल्हा चूल आणि धूर मुक्तही झाला आहे.
केरोसीन पुरवठा ही नेहमीच प्रशासनाच्या दृष्टीने आव्हानात्मक जबाबदारी राहिली आहे. जास्तीत जास्त लोकांना उज्वला योजनेमध्ये सहभागी करून घेऊन घरगुती केरोसीनचा वापर शुन्यावर आणण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. प्रदूषण मुक्तीच्या दृष्टीने सुद्धा टाकलेले हे एक चांगले पाऊल आहे. कोरोनाशी दोन हात करत असतानाच अन्य विषयांकडे देखील लक्ष पुरवून जिल्हा केरोसीन मुक्त झालेला आहे ही बाब अत्यंत समाधानकारक आहे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी