नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : पीककर्ज वाटपास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:33 AM2018-07-03T01:33:54+5:302018-07-03T01:34:10+5:30
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ३० जूनअखेर ३० टक्के वसुली झालेली असून, आजवर २३७ कोटींचे पीककर्ज वितरण करण्यात आले आहे. मात्र अजूनही पात्र शेतकऱ्यांची मागणीचा विचार करता जिल्हा बॅँकेने कर्जवसुली व पीककर्ज वाटपास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी दिली आहे.
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ३० जूनअखेर ३० टक्के वसुली झालेली असून, आजवर २३७ कोटींचे पीककर्ज वितरण करण्यात आले आहे. मात्र अजूनही पात्र शेतकऱ्यांची मागणीचा विचार करता जिल्हा बॅँकेने कर्जवसुली व पीककर्ज वाटपास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी दिली आहे.
नियमित कर्ज भरणारे व पात्र शेतकºयांना निधीअभावी कर्ज वाटप करता आले नाही त्यासाठी अहेर यांनी बँकेच्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना सोमवारी नव्याने आदेश देऊन दिनांक ३१ जुलै २०१८ अखेर जास्तीत जास्त कर्जवसुली व कर्जवाटप करून राज्य सहकारी बँकेची परतफेड झाल्यास राज्य बँकेकडून नव्याने कर्ज उचलून तसेच नाबार्ड बँकेकडून कर्जवाटपासाठी निधी उपलब्ध झाल्यास पात्र व नियमित कर्ज भरणाºया सभासदांना कर्जवाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. कर्जवसुली अधिक प्रभावी होण्यासाठी बँक राबवित असलेली सामोपचार कर्ज परतफेड योजनेस ३० जून २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ज्या शेतकºयाकडे मुद्दल व व्याजासह दीड लाखांवरील थकीत कर्ज आहे व ज्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आलेली आहेत अशा जिल्ह्यातील २१,७०० खातेदारांपैकी ११,००० खातेदारांनी या योजनेचा लाभ घेतलेला असून, बँकेस कर्जवसुलीपोटी ९८ कोटी प्राप्त झालेले आहेत. सदर योजनेची शासनाने मुदत ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत वाढविली आहे.