नाशिक जिल्हा कृषी पर्यटन घोषित करावा

By Admin | Published: September 28, 2016 01:14 AM2016-09-28T01:14:36+5:302016-09-28T01:14:52+5:30

जागतिक पर्यटन दिन : कृषी पर्यटन चर्चासत्रात सूर

Nashik district should declare agriculture tourism | नाशिक जिल्हा कृषी पर्यटन घोषित करावा

नाशिक जिल्हा कृषी पर्यटन घोषित करावा

googlenewsNext

नाशिक : महाराष्ट्रात ३२८ कृषी पर्यटन केंद्र असून, त्याद्वारे वार्षिक १७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते़ नाशिक जिल्ह्याचा भौगोलिक व ऐतिहासिकदृष्ट्या असलेले महत्त्वच येथील निसर्गरम्य ठिकाणे व आल्हाददायक वातावरण यामुळे कृषी पर्यटनाला चांगला वाव आहे़ नाशिक जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने प्रचार - प्रसार व प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून, नाशिकला कृषी पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र स्टेट अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड रुरल टुरिझमचे अध्यक्ष पांडुरंग तावरे यांनी केले़
जागतिक पर्यटन दिनानिमित्त संस्कृती अ‍ॅग्रो टुरिझम (मामाचा मळा) येथे आयोजित कृषी पर्यटनातील संधी या विषयावर ते बोलत होते़ पुढे बोलताना ते म्हणाले की, कृषी पर्यटनामुळे पर्यावरणाचे संवर्धन तर होतेच, पण त्याचबरोबर ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व संवर्धन, स्थानिकांना रोजगार निर्माण होतो़ त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला व गावरान उत्पादनांना एक बाजारपेठ मिळते़ विशेष म्हणजे या कृषी पर्यटनासाठी खूप मोठ्या जमिनीची गरज असते असे नाही, तर पाच एकर शेती असणारे आपल्या शेतातील २० टक्के भाग हा कृषी पर्यटनासाठी वापरू शकतात़ विशेष म्हणजे यासाठी शासनाच्या आठ खोल्यांची परवानगीचीही आवश्यकता नाही़ त्यातच शासनाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कृषी सहल अनिवार्य केली असून, या पर्यटनाच्या कक्षा अधिक रुंदावल्या आहेत़ भारतात दरवर्षी साधारणत: एक कोटी पर्यटक येतात यातील बहुतांशी पर्यटकांना कृषी पर्यटनाकडे साद घालणे सहज शक्य आहे़ असे तावरे म्हणाले़ यावेळी दिलीपसिंह बेनीवाल, तुकाराम बोराडे, मुरलीधर पाटील, उपस्थित होते़ प्रास्ताविक दिग्विजय मानकर यांनी केले़ आभार चंद्रशेखर कापसे यांनी मानले़ (प्रतिनिधी)

Web Title: Nashik district should declare agriculture tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.