नाशिक जिल्हा तिसऱ्या टप्प्यात अनलॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 06:52 PM2021-06-05T18:52:42+5:302021-06-05T18:56:37+5:30
नाशिक : नाशिक शहरात कोरोना बाधित रूग्णांचा पॉझीटीव्ह दर ३ टक्के असला तरी, ग्रामीण जिल्ह्याचा दर ९ टक्क्यापर्यंत असल्याने शासनाने अनलॉकबाबत ठरवून दिलेले निकषात नाशिक जिल्हा तिसऱ्या टप्प्यात बसत असून, त्यामुळे अंशत: लॉकडाऊन कायम ठेवण्याचा मात्र सर्व प्रकारचे दुकाने, व्यवसाय सुरू करण्यासाठी दुपारी चार वाजेपर्यंत मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

शासनाने तिसऱ्या टप्प्यासाठी जाहीर केलेले निकष पाहता, रेस्टॉरंट, हॉटेल्स, वाईनशॉप सुरू करण्याबरोबरच जीम, सलून, उद्याने तसेच लग्न समारंभांना निवडक लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येणार आहे. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून, त्यापार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेवून नाशिक जिल्ह्यातील काेरोना रूग्णांची सद्यस्थिती, पॉझीटीव्ह रेट, ऑक्सीजन बेडची संख्या व लसीकरणाची माहिती जाणून घेतली.
नाशिक शहरातील पॉझीटीव्ह रेट ३ टक्के, नाशिक ग्रामीण भागातील ९ टक्के, मालेगाव महापालिका हद्दीत ३ टक्के पॉझीटीव्ह दर असून, जिल्ह्याचा एकूण दर पाच टक्क्याच्या पुढे असल्याने शासनाच्या पहिल्या टप्प्याच्या निकषात बसत नसल्याचे सांगण्यात आले. तसेच ऑक्सीजन बेड देखील २५ टक्क्याहून अधिक रिकामे आहेत. मात्र पॉझीटीव्ह दर अधिक असल्याने नाशिक जिल्हा तिसरा टप्प्यात मोडत असल्याने त्यासाठी शासनाने ठरवून दिलेले अनलॉकचे नियम लागू केले जाणार असल्याचे समजते.