नाशिक विभागाचा निकाल 9.84 टक्यांनी घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 02:47 PM2019-06-08T14:47:18+5:302019-06-08T14:49:39+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ८६.४२ टक्के असलेल्या विभागाचा निकाल यावर्षी ७७.५८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांऐवजी कृतीपत्रीकांचा केलेला प्रयोग विद्यार्थ्यांच्या लक्ष न आल्याने निकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचा निरीक्षण शैक्षणिक क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे.
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ८६.४२ टक्के असलेल्या विभागाचा निकाल यावर्षी ७७.५८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांऐवजी कृतीपत्रीकांचा केलेला प्रयोग विद्यार्थ्यांच्या लक्ष न आल्याने निकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचा निरीक्षण शैक्षणिक क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह, धुळे, नंदुरबार जळगाल या चारही जिल्ह्यांत ११ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत प्रात्यक्षिक तर १ ते २२ मार्च या कालवधीत ४३३ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. विभागात मराठी , हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, गुजराथी,कन्नड व तमीळ या आठ भाषांमध्ये घेण्यात आलेल्या पपरीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विभागातून परीक्षेला प्रविष्ठ एकूण १ लाख ९८ हजार ७५० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४१ हजार १९३ म्हणजे ७७.५८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातील तब्बल १७९ शाळाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तर ४४५ शालांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक लागला आहे. यात प्रामुख्याने इंग्रजी विषयात विभागातील विद्यार्थ्यांची हुश्शारी दिसून आली असून प्रथम भाषा इंग्रजी विषयाचे सर्वाधिक ९६.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्या खोलोखाल विज्ञान ९४.४८ द्वीतीय व तृतीय भाषा मराठी ९३.६२, गणित ९२.५७, सामाजिक शास्त्र ९२. १२, मराठी प्रथम भाषा ७९.२६ , प्रथम भाषा हिंदी ८४.१८, इंग्रजी द्वतीय वतृतीय भाषा ८३.११, प्रथम भाषा उर्दू ८०.३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दहावीच्या परीक्षा यावर्षी प्रथमच प्रश्नपत्रीकांऐवजी कृतीपत्रीकांच्या पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. त्यासाठी शिक्षकांचे विशेष प्रशिक्षणही घेण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांकडून सरावासाठी कृतीपत्रीका सोडवूनही घेण्यात आल्या होत्या. परंतु हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पूर्णपणे पचणी न पडल्याचे निकालाचा टक्का घसरल्याने दिसून येत आहे.
यामुळे घसरला निकालाचा टक्का
प्रश्नपत्रिके ऐवजी कृतीपत्रिकेची बदललेली परीक्षा
आठवीपर्यंत परीक्षा नसल्याने अभ्यासाचा सराव नसणे
फिरत्या पथकांची परीक्षेवर करडी नजर
बैठे पथकांनी पेपर पूर्ण होईपर्यंत परीक्षेवर नजर ठेवली