Nashik Lok Sabha Election :'ज्या कुणाला तिकिट मिळेल त्याचं काम...', उमेदवारीवरुन छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:19 PM2024-04-01T12:19:21+5:302024-04-01T12:24:14+5:30
Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघात तिकिट कोणाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमिवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Nashik Lok Sabha Election : महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघातून लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा सुरू असून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनीही तिकिटासाठी काही दिवसापूर्वी ठाण्यात शक्तिप्रदर्शन केलं होतं. तर दुसरीकडे, भाजपानेही या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. यामुळे या मतदारसंघात तिकिट कोणाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमिवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आता जागावाटपाची चर्चा २०२९ मध्येच; उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून काँग्रेस नेत्यांना सुनावले
दोन दिवसापूर्वी भुजबळ यांनी माझ्या उमेदवारीची दिल्लीत चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते, तर आज त्यांनी ज्यांना कोणाला तिकिट मिळेल त्यांचं काम करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्कुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
'ज्या कुणाला तिकिट मिळेल त्याचं काम सगळे करु'
"शिंदे गटाचे हेमंत गोडसे आहेत ते प्रयत्न करताहेत, ते सध्या खासदार आहेत प्रयत्न करणे चूक नाही. भाजपचे १०० नगरसेवक आहेत आणि त्यांचे आमदारही आहेत त्यामुळे ते प्रयत्न करतात त्यात काही चूक नाही. ज्याला कोणाला तिकिट मिळाले तर त्याचे आम्ही सगळे काम करणार, असंही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
"येवला सोडून कुठेही जाणार नाही, कुठेही गेलो तरी येवल्यावरच प्रेम कमी होणार नाही, असंही भुजबळ म्हणाले. 'राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्या जाण्या-येण्याचा खर्च जास्त असतो, त्यांचं प्रोटेक्शन मोठं असतो. आता निवडणुका आल्या आहेत, कोण काय आरोप करेल काहीही सांगता येत नाही. आता पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या जाण्या-येण्याच्या खर्चावरही टीका झाली तर कसं काय होईल?, असा सवालही भुजबळ यांनी केला.