नाशिक महापालिकेला ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पामार्फत मिळणार दरमहा एक लाख युनिट वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:39 PM2017-11-28T15:39:53+5:302017-11-28T15:41:09+5:30

जर्मन सरकारचा उपक्रम : पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण

Nashik Municipal Corporation's 'West to Energy' project will generate one lakh units per month | नाशिक महापालिकेला ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पामार्फत मिळणार दरमहा एक लाख युनिट वीज

नाशिक महापालिकेला ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पामार्फत मिळणार दरमहा एक लाख युनिट वीज

Next
ठळक मुद्देप्रकल्प चालविण्याकरीता महापालिका संबंधित मक्तेदाराला दरमहा ५ लक्ष रुपये मोजणार आहेप्रकल्पासाठी जी.आय.झेड जर्मनी यांचे कडून नाशिक महानगरपालिकेस ६.८० कोटी रुपये इतके अनुदान प्राप्त झाले

नाशिक - जर्मन सरकार आणि भारत सरकार यांचे संयुक्त प्रयत्नातून नाशिक शहरामध्ये कचऱ्यापासून कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि.२९) दुपारी १२ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या पथदर्शी प्रकल्पातून नाशिक महापालिकेला दरमहा १ लाख युनिट इतकी वीज पुढील दहा वर्षापर्यंत उपलब्ध होणार असून सदर प्रकल्प चालविण्याकरीता महापालिका संबंधित मक्तेदाराला दरमहा ५ लक्ष रुपये मोजणार आहे.
जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या  पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत सदर प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी जी.आय.झेड जर्मनी यांचे कडून तांत्रिक व आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. सदर प्रकल्पात दररोज सुमारे १५ ते २० मे. टन ओला कचरा व १० ते १५ मे.टन सार्वजनिक शौचालयातील मलजल अशा ३० मे.टन कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस / मिथेन गॅस तयार करुन त्या द्वारे वीज निर्मिती करण्यात येणार आहे. ८ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी जी.आय.झेड जर्मनी यांचे कडून नाशिक महानगरपालिकेस ६.८० कोटी रुपये इतके अनुदान प्राप्त झाले असून प्रकल्प उभारणीसाठी लागणारा १.२२ कोटी रुपये खर्च कंपनी करीत आहे. प्रकल्प उभारणीसाठी नाशिक महानगरपालिकेची कोणतीही भांडवली गुंतवणुक नाही मात्र प्रकल्प उभारणी करिता सुमारे ६ हजार चौ.मीटर जागा मनपा खत प्रकल्पा शेजारी पुर्वीचे जकात मध्यवर्ती गोडावून जवळ मनपाने उपलब्ध करु न दिलेली आहे. या प्रकल्प उभारणीचे काम मे. विल्होळी वेस्ट मॅनेजमेंन्ट प्रा.लि.बंगलोर यांचे मार्फत करण्यात आले आहे. १० वर्ष कालावधी साठी संपूर्ण प्रकल्प चालविणे, देखभाल व दुरु स्ती करणेचे काम सदर कंपनी मार्फत करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पासाठी लागणारा ओला कचरा (हॉटेल वेस्ट व भाजीपाला वेस्ट) व मलजल वाहतूकीची जबाबदारी सुध्दा कंपनीची असणार आहे. संबंधित कंपनी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून वीज निर्मिती तयार होणाºया वीजेतून नाशिक महानगर पालिकेस दरमहा सुमारे एक लाख युनिट इतकी वीज पुरविणार आहे.
इन्फो
राज्याच्या पॉवर ग्रीडला जोडणी
प्रकल्पात तयार झालेली वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पॉवर ग्रीडला जोडण्यात येणार असून जेवढी वीज पॉवर ग्रीड मध्ये टाकण्यात येईल तेवढे युनिट मनपास इतर वीज देयकातून सुट मिळणार आहे. याशिवाय, सदर वीजेचा वापर महापालिकेला खतप्रकल्पावर करता येणार असून त्यातून महापालिकेची बचत होणार आहे.

Web Title: Nashik Municipal Corporation's 'West to Energy' project will generate one lakh units per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.