सीए परीक्षेत नाशिकचा विद्यार्थी राष्ट्रीय क्रमवारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:18 AM2021-09-14T04:18:38+5:302021-09-14T04:18:38+5:30
नाशिक : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियातर्फे जुलैमध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी ...
नाशिक : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियातर्फे जुलैमध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला असून, नाशिकचा आगम शहा हा विद्यार्थी राष्ट्रीय क्रमवारीत ४६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाने नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.
कोरोनाच्या सावटाखाली आणि ऑनलाईन परीक्षेच्या वातावरणात झालेल्या परीक्षेतही नाशिकची कामगिरी समाधानकारक राहिली. शहा याने राष्ट्रीय क्रमवारीत ४६ वे स्थान मिळवले तर सी. ए. अभ्यासक्रमाशी संबंधित फाऊंडेशनसह अन्य परीक्षांमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. अंतिम परीक्षेत नाशिकच्या श्वेतांक पाटील याने पहिल्या प्रयत्नात यश मिळवले आहे. थमेश लोहारकर, अनुराज ढोबळे यांच्यासह खुशबू बुरड, वैष्णवी शिंदे तसेच ओमकार सोनवणे, वैष्णवी शिंदे, किरण वाझट, गोपिका मगजी, साक्षी गायकवाड यांनीही अंतिम परीक्षेत यशस्वी कामगिरी केली आहे.
सीए फाऊंडेशनच्या परीक्षेला देशभरातून ७१ हजार ९६७ विद्यार्थी बसले होते. यापैकी १९ हजार १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णांचे प्रमाण २६.६२ टक्के आहे. सीए अंतिम परीक्षेत (फायनल) पहिल्या ग्रुपकरिता ४९ हजार ३५८ विद्यार्थ्यांपैकी नऊ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. हे प्रमाण २०.२३ टक्के राहिले. ग्रुप दोनमध्ये ४२ हजार २०३ विद्यार्थ्यांपैकी सात हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण १७.३६ टक्के आहे. तर दोन्ही ग्रुपची परीक्षा एकाचवेळी २३ हजार ९८१ विद्यार्थ्यांनी दिली. यातून दोन हजार ८७० विद्यार्थ्यांनी यश मिळवले. दोन्ही ग्रुप उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी ११.९७ इतकी आहे.
130921\13nsk_44_13092021_13.jpg~130921\13nsk_45_13092021_13.jpg
आगम शहा,~स्वस्तिक पाटील