बनावट नोटाप्रकरणी नाशिक-वलसाड पोलीस 'साथ-साथ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:54 PM2021-06-20T16:54:19+5:302021-06-20T16:58:02+5:30

दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांनी एक विशेष पथक या गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्त केले आहे. आपआपसांत समन्वय साधून गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील वलसाड जिल्ह्यासह नाशिकच्या सुरगाणा, पेठ तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Nashik-Valsad police 'together' in counterfeit note case | बनावट नोटाप्रकरणी नाशिक-वलसाड पोलीस 'साथ-साथ'

बनावट नोटाप्रकरणी नाशिक-वलसाड पोलीस 'साथ-साथ'

Next
ठळक मुद्देविशेष पथकाची नियुक्तीसीमावर्ती भागात बनावट नोटांची 'चलती'सुरगाणा पोलीस सातत्याने संपर्कात असल्याचा दावा

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील गुजरातच्या सीमेवरील आदिवासी गावे, पाड्यांवर बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा गैरप्रकार वलसाड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दरम्यान, वलसाड-सुरगाणा पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी, कर्मचारी हे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असून बनावट नोटांच्या प्रकरणाची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस प्रयत्नशील असल्याचा दावा नाशिक ग्रामिण पोलिसांकडून केला जात आहे.

सुरगाणा तालुक्यातील गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या गुही, मांदा, मोरचोंड येथून चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच वलसाड जिल्ह्यातून चार असे एकुण आठ संशयित आरोपी या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी गजाआड केले आहे. दरम्यान, वलसाडचे पोलीस अधिक्षक राजदीपसिंह झाला आणि नाशिकचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील हे एकमेकांच्या सतत संपर्कात असून वलसाड, धरमपुर पोलिसांना आवश्यक ती सर्व मदत बनावट नोटांच्या गुन्ह्याच्या तपासासाठी सुरगाणा पोलिसांकडून केली जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. सुरगाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना वलसाड वरीष्ठ पोलीस निरिक्षकांच्या संपर्कात राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांनी एक विशेष पथक या गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्त केले आहे. आपआपसांत समन्वय साधून गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील वलसाड जिल्ह्यासह नाशिकच्या सुरगाणा, पेठ तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. बनावट नोटांप्रकरणी धरमपुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला आहे.

सराईत गुन्हेगारासह सेतु चालक सहभागी
बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रतपा करणाऱ्यांमध्ये सुरागाण्यातील संशयित सराईत गुन्हेगार हरिदास चौधरी याच्यासोबत उंबरठाण येथे सेतु कार्यालय चालविणारा संशयित अनिल बोचल हादेखील सहभागी असल्याचे पोलीस तापासात समोर आले आहे. पोलिसांनी यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. चौधरीविरुध्द यापूर्वी सुरगाणा, धरमपुर, सापुतारा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. संशयित जयसिंग वळवी, भगवंत डंबाळे यांनाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

 

Web Title: Nashik-Valsad police 'together' in counterfeit note case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.