भाजपा मंत्र्याची राष्ट्रवादी मुक्त ची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 01:39 PM2019-09-19T13:39:12+5:302019-09-19T13:40:01+5:30

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप हा जनेतच्या आदेशाचा महाकुंभ असून जनतेचा हा संकल्प घेऊन भाजपा ...

nashik,bjp,minister,announces,nation-free',debate | भाजपा मंत्र्याची राष्ट्रवादी मुक्त ची घोषणा

भाजपा मंत्र्याची राष्ट्रवादी मुक्त ची घोषणा

Next

नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप हा जनेतच्या आदेशाचा महाकुंभ असून जनतेचा हा संकल्प घेऊन भाजपा राज्यातील निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची भुमिका भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी नाशिकमध्ये मांडली. दरम्यान, कॉँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी मुक्तची घोषणा मंत्र्यांनी केली.
पंचवटीतील तपोवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. तत्पूर्वी झालेल्या भाषणांमध्ये भाजपाच्या मंत्र्यांनी महाजनादेश यात्रा म्हणजे महाराष्टत पुन्हा देवेंद्र सरकार स्थापन करण्याचा संकल्प असल्याचे जाहिर केले. यावेळी अनेक नेत्यांनी नाशिकधील कुंभमेळा भूमीतून जनतेच्या आदेशाचा कुंभ घेऊन राज्यभरात जाणार असल्याचे सांगितले. काही नेत्यांनी महाराष्टतून राष्ट्रवादी मुक्त ची घोषणा केली.
अनेक नेत्यांनी नरेंद्र मोदी हे देशातील सक्षम नेतृत्व असल्याचे सांगून कॉंग्रेसवर चौफेर टिका करीत कॉँग्रेस राष्टÑवादीने देशात जातीपातीचे राजकारण केल्याचा आरोप केला. पुढील पाच वर्षात राज्यात सुवर्णकलश बसविण्याची घोषणा करीत तरुण आणि बेराजगारांचे स्वप्न पुर्ण करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. शेतकरी, महिलांना दिलासा देण्याचे काम सरकारने केल्याचा दावा देखील अनेक मंत्र्यांनी केला.
याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंट्टीवार आदिंनी भाषणे केली.

 

 

Web Title: nashik,bjp,minister,announces,nation-free',debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.