जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या आता आॅनलाइन बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 05:36 PM2019-04-15T17:36:26+5:302019-04-15T17:37:16+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या गट वर्ग ३ व ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यासाठी जिल्हा परिषदेने आॅनलाइन सॉफ्टवेअर तयार ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या गट वर्ग ३ व ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यासाठी जिल्हा परिषदेने आॅनलाइन सॉफ्टवेअर तयार केले असून, सन २०१९ च्या वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.
शासनाने जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील कर्मचाºयांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत धोरण निश्चित केलेले आहे. त्यानुसार दरवर्षी समुपदेशनाने आॅफलाइन पद्धतीने बदल्यांची कार्यवाही करण्यात येते. समुपदेशनाने आॅफलाइन पद्धतीने बदल्या करण्याच्या प्रक्रि येत वेळेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. बदलीप्रक्रि या पारदर्शी, सुकर व वेळेचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने आॅनलाइन सॉफ्टवेअर तयार केले असून, त्यामध्ये सर्व कर्मचाºयांची माहिती भरण्यात आलेली आहे.
शासन निर्णयानुसार काही बाबींच्या अनुषंगाने कर्मचारी बदल्यांमधून सूट मिळवितात किंवा विनंती व प्रशासकीय बदलीचा लाभ घेतात. अशा कर्मचाºयांनी आॅनलाइन बदलीची माहिती भरताना याबाबतचा पुरावा अपलोड करणे आवश्यक असून याबाबतच्या लेखी सूचना सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पती-पत्नी एकत्रीकरण असल्यास सक्षम प्राधिकरणाचा दाखला, विविध प्रकारचे आजार असलेले, अपंग, मतिमंद व अपंग मुलांचे पालक यांनी जिल्हा शल्यचिकित्सकाचे किंवा सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.