विद्युत तारांमुळे नागरे मळ्यात पेटला ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 04:49 PM2018-01-14T16:49:16+5:302018-01-14T16:54:21+5:30
नाशिक : गवताच्या पेंढ्यांची वाहतूक करणा-या ट्रकला विद्युत तारांमुळे आग लागल्याची घटना रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील नागरे मळ्यात घडली़ सिडको विभागाच्या अग्निशमन बंब त्वरीत घटनास्थळी पोहोचला व आग विझविली़ सुदैवाने यामध्ये कोणतही जिवीत हानी झाली नाही़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास चेतनानगर परिसरातील नागरे मळ्यात गवताच्या पेंढीने भरलेला ट्रक (एम.एच१५ डिके ९६५५)जात होता़ या ठिकाणी असलेल्या विद्युतवाहक तारेला गवताच्या पेंढ्या लागल्याने घर्षण झाले व वाळलेल्या गवताने तत्काळ पेट घेतला़ हा प्रकार लक्षात येताच तेथेच असलेल्या पाण्याच्या टँकरने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग भडकत चालल्याने सिडकोच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली़
सिडको अग्निशमन विभागाचा एक बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी काही वेळातच आग विझविली़ ट्रकमध्ये वाळलेले गवत असल्याने त्याने तत्काळ पेट घेतल्याचे नागरिकांनी सांगितले़ दरम्यान, आग लवकर विझविण्यात आल्याने आर्थिक हानी झाली असली तरी सुदैवाने जिवीत हानी झालेली नाही़