मनपाच्या कारवाईने परिक्षार्थींची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 06:58 PM2019-05-05T18:58:08+5:302019-05-05T18:58:53+5:30
नाशिक: महापालिकेच्या मालकीच्या मिळकतीचा व्यावसायिक वापर केला जात असल्याने पालिकेने अनेक मिळकती सील केल्याने वाचनालये, अभ्यासिकांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची ...
नाशिक: महापालिकेच्या मालकीच्या मिळकतीचा व्यावसायिक वापर केला जात असल्याने पालिकेने अनेक मिळकती सील केल्याने वाचनालये, अभ्यासिकांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. आगामी मे आणि जून महिन्यात अनेक परीक्षा असल्याने परिक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याने निदान विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालये सुरू करण्याची मागणी करण्यासाठी विविध संस्था,संघटनांकडून आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे.
महापालिकेच्या मिळकतींचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरूद्ध मोहिम उघडून पालिकेने वाचनालये, अभ्यासिका सील करण्यास सुरूवात केली आहे. तत्पूर्वी पालिकेकडून संंबधितांना नोटीसा देखील बजविल्या आहेत. या निटीसीनंतर शनिवारपासून शहरात अशाप्रकाच्या मिळकती सील केल्या जात आहेत.
मनपाने शहरातील अनेक समाज मंदिरे सील केले आहेत. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. यावर काहीतरी तोडगा काढण्याची मागणी होत असल्याने शहरातील काही संस्था, संघटनांचे नेते आयुक्तांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती सांगणार आहेत. बहुसंख्य समाजमंदिरात सार्वजनिक वाचनालय अभ्यासिका व्यायामशाळा यांचा समावेश आहे. मे महिन्यात महाविद्यालयाच्या परीक्षा तसेच मेगाभरतीमुळे विद्यार्थी अभ्यासिकेत अभ्यास करीत आहेत. पोलीस भरतीची तयारी देखील अनेक तरुण व्यायामशाळेत जाऊन कसरत करीत आहेत. शनिवारी मनपाने अचानकपणे अनेक समाजमंदिरांना सीलबंद करून बंद करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी वर्गाचे नुकसान होत आहे.
समाजमंदिरे बांधतांना समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होऊ शकेल ही उदात्त भावना होती. पुढे त्याचे व्यावसायिकीकरण होईल असे वाटले नव्हते. मात्र या मिळकती ज्या सेवाभावी संस्थांकडे सोपविण्यात आल्या होत्या त्यांनी व्यावसायिक वापर सुरू केल्याने मालिपेकला कारवाई करावी लागत आहे. खरेतर विद्यार्थ्यांसाठी मनपाच्या अभ्यासिका, वाचनालय आणि व्यायाम शाळा महत्वाची भूमिका बजावत आहेत. मनपाने मे महिन्याच्या कालावधीचा विचार करून मनपा कर्मचाºयांवर जबाबदारी सोपवून या वास्तू उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.