नाशिक : न्यायालयाकडून काढण्यात येणाºया वॉरंटवर कनिष्ठ लिपिकांनीच परस्पर न्यायाधीशांच्या सह्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी दोन कनिष्ठ लिपीकांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी निलंबित केले आहे़ निलंबित करण्यात आलेल्या लिपिकांमध्ये जिल्हा न्यायालय व दिंडोरी न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाºयांकडे असलेल्या लिपीकांचा समावेश असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे़न्यायालयात सुरू असलेला दिवाणी दावा वा फौजदारी खटल्यात गैरहजर राहणारे फिर्यादी वा आरोपीचे साक्षीदार, पंच यांना न्यायाधीशांकडू वॉरंट काढले जाते़ यापैकी वारंवार वारंट काढूनही गैरहजर राहणाºयास गैरजमानती वॉरंटही काढले जाते़ जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी़व्ही़देढीया यांच्या न्यायालयातील कनिष्ठ लिपीक संशयित बी़बी़आंधळे यांनी न्यायाधीशांचे आदेश व वॉरंटवर परस्पर न्यायाधीशांच्या सह्या केल्याचे समोर आले़ या प्रमाणेच दिंडोरी न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी़एस़बोरा यांच्या न्यायालयातील कनिष्ठ लिपीक आऱबी़बलसाणे यांनीही न्यायाधीशांचे आदेश व वॉरंटवर परस्पर न्यायाधीशांच्या सह्या केल्याचे काही दिवसांपुर्वीच समोर आले़प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे या प्रकाराची गंभीर दखल घेत कनिष्ठ लिपीक आंधळे व बलसाणे या दोघांंची चौकशी केल्यानंतर या दोघांनाही निलंबित करण्याचे आदेश सोमवारी (दि़२७) दिले़
नाशिक जिल्हा न्यायालयातील लिपीकाने केल्या वारंटवर परस्पर न्यायाधीशांच्या सह्या : दोघांचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 8:02 PM
नाशिक : न्यायालयाकडून काढण्यात येणाºया वॉरंटवर कनिष्ठ लिपिकांनीच परस्पर न्यायाधीशांच्या सह्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी दोन कनिष्ठ लिपीकांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी निलंबित केले आहे़ निलंबित करण्यात आलेल्या लिपिकांमध्ये जिल्हा न्यायालय व दिंडोरी न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाºयांकडे असलेल्या लिपीकांचा समावेश असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी ...
ठळक मुद्देनाशिक जिल्हा न्यायालय व दिंडोरी न्यायालयातील प्रकार दोन कनिष्ठ लिपीक निलंबित ; प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांचे आदेश