नाशिक परिक्षेत्रात तंबाखूजन्य पदार्थबंदीच्या ‘कोटपा’ कायद्याची शून्य अंमलबजावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:24 PM2018-03-12T22:24:21+5:302018-03-12T22:28:13+5:30

नाशिक : महाराष्ट्रात प्रतिदिन ५२९ मुले सिगारेट वा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर सुरू करतात़ यामध्ये महाविद्यालयीन मुले-मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून ५० टक्के कर्करोग हा तोंडावाटे, तर ९० टक्के कर्करोगास तंबाखू कारणीभूत ठरते़ मात्र, दुर्दैवाने देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईस व्यसनातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचा अशा तंबाखूजन्य पदार्थबंदीसाठीच्या ‘कोटपा’ या कायद्याबाबत माहिती वा त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव आहे़

nashik,division,Tobacco,ban,law,implementation,zero | नाशिक परिक्षेत्रात तंबाखूजन्य पदार्थबंदीच्या ‘कोटपा’ कायद्याची शून्य अंमलबजावणी!

नाशिक परिक्षेत्रात तंबाखूजन्य पदार्थबंदीच्या ‘कोटपा’ कायद्याची शून्य अंमलबजावणी!

Next
ठळक मुद्देनाशिक परिक्षेत्रात : पोलिसांच्या प्रशिक्षणानंतर विशेष मोहीम संबंध हेल्थ फाउंडेशन संस्थेतर्फे प्रशिक्षण

नाशिक : महाराष्ट्रात प्रतिदिन ५२९ मुले सिगारेट वा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर सुरू करतात़ यामध्ये महाविद्यालयीन मुले-मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून ५० टक्के कर्करोग हा तोंडावाटे, तर ९० टक्के कर्करोगास तंबाखू कारणीभूत ठरते़ मात्र, दुर्दैवाने देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईस व्यसनातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचा अशा तंबाखूजन्य पदार्थबंदीसाठीच्या ‘कोटपा’ या कायद्याबाबत माहिती वा त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव आहे़ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंध हेल्थ फाउंडेशन संस्थेतर्फे नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिका-यांना सोमवारी (दि़१२) प्रशिक्षण देण्यात आले़

विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळील नूतन सभागृहात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते़ नाशिक परीक्षेत्रातील अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नाशिक ग्रामीण यातील तीस पोलिस निरीक्षकांना सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ सेवन बंदी कायदा (कोटपा)चे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे़ सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखूच्या उत्पादनांची प्रत्यक्ष थेट / अप्रत्यक्ष जाहिराती, अल्पवयीन बालकांना तंबाखूजन्य उत्पादने विक्री, शाळांच्या १०० यार्ड परिसरात विक्री करणे हे कोटपा कायद्यानुसार प्रतिबंधित आहे़
संबंध फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे पोलीस अधिका-यांना कोटपा कायद्याची सखोल माहिती मिळाली असून, याचा अंमलबजावणी करताना फायदा होणार आहे़ तसेच या कायद्यामुळे तरुणांना व्यसनापासून रोखता येणार आहे़

पुस्तिकेचे प्रकाशन


पोलीस अधिका-यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कोटपा कायद्याबाबत मराठीतून माहिती देणा-या एका विशेष पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले़ यामध्ये कायद्याची सखोल माहिती व त्यातील कलमांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे़ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे केरळ व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी झाले आहे़


९० टक्के कर्करोग तंबाखूमुळे
जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षण (जीएटीएस) २०१७ नुसार महाराष्ट्रातील २.५ कोटी लोक तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात़ तंबाखुचा वापर करणाºयांपैकी सुमारे ४५ हजार लोकांचा अकाली मृत्यू होतो़, तर महाराष्ट्रात प्रतिदिन ५२९ मुले तंबाखूच्या वापरास प्रारंभ करीत असल्याचे वास्तव आहे़ मात्र, कोटपा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी केल्यास यामध्ये घट येण्यास मदत होईल़ तोंडावाटे होणा-या कर्करोगाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे उपचारांपेक्षा प्रतिबंध हा नेहेमीच चांगला असतो़
- डॉ. गोविंद मंत्री, कर्करोगतज्ज्ञ तथा व्हॉइस आॅफ टोबॅको व्हिक्टिम मोहिमेचे अधिकारी

Web Title: nashik,division,Tobacco,ban,law,implementation,zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.