नाशिक : महाराष्ट्रात प्रतिदिन ५२९ मुले सिगारेट वा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर सुरू करतात़ यामध्ये महाविद्यालयीन मुले-मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून ५० टक्के कर्करोग हा तोंडावाटे, तर ९० टक्के कर्करोगास तंबाखू कारणीभूत ठरते़ मात्र, दुर्दैवाने देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईस व्यसनातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचा अशा तंबाखूजन्य पदार्थबंदीसाठीच्या ‘कोटपा’ या कायद्याबाबत माहिती वा त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव आहे़ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंध हेल्थ फाउंडेशन संस्थेतर्फे नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिका-यांना सोमवारी (दि़१२) प्रशिक्षण देण्यात आले़
विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळील नूतन सभागृहात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते़ नाशिक परीक्षेत्रातील अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नाशिक ग्रामीण यातील तीस पोलिस निरीक्षकांना सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ सेवन बंदी कायदा (कोटपा)चे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे़ सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखूच्या उत्पादनांची प्रत्यक्ष थेट / अप्रत्यक्ष जाहिराती, अल्पवयीन बालकांना तंबाखूजन्य उत्पादने विक्री, शाळांच्या १०० यार्ड परिसरात विक्री करणे हे कोटपा कायद्यानुसार प्रतिबंधित आहे़संबंध फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे पोलीस अधिका-यांना कोटपा कायद्याची सखोल माहिती मिळाली असून, याचा अंमलबजावणी करताना फायदा होणार आहे़ तसेच या कायद्यामुळे तरुणांना व्यसनापासून रोखता येणार आहे़पुस्तिकेचे प्रकाशन