हॉटेलचा मॅनेजर अडीच लाखांची रोकड घेऊन फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:41 PM2018-03-10T23:41:54+5:302018-03-10T23:41:54+5:30
नाशिक : हॉटेलमध्ये विवाहाच्या बुकिंगसाठी ग्राहकाने दिलेले पैसे व तीन दिवसांची जमा झालेली रक्कम असे २ लाख ६८ हजार रुपये घेऊन हॉटेलचा जनरल मॅनेजर फरार झाल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल ज्युपिटरमध्ये घडली आहे़
नाशिक : हॉटेलमध्ये विवाहाच्या बुकिंगसाठी ग्राहकाने दिलेले पैसे व तीन दिवसांची जमा झालेली रक्कम असे २ लाख ६८ हजार रुपये घेऊन हॉटेलचा जनरल मॅनेजर फरार झाल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल ज्युपिटरमध्ये घडली आहे़
आकाश शर्मा (रा़ ज्युपिटर हॉटेल, मुंबई-आग्रारोड, नाशिक) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या ज्युपिटर हॉटेलमध्ये संशयित दुर्गेश रामकुमार चौधरी हा जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत होता़ १७ ते १९ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत डॉ़ देवरे यांनी हॉटेलमध्ये जाऊन साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी हॉटेल बुक करून दोन लाख रुपये हॉटेल मॅनेजर तुषार अभनावे व किरण हिवासे यांच्यासमोर चौधरीस दिले़ मात्र चौधरी याने देवरे यांना पावती न देता उद्या पावती देतो, असे सांगितले़
त्यानुसार दुसºया दिवशी सकाळी देवरे यांनी फोन केला असता मी हॉटेलमध्ये नाही, तुमची रक्कम उद्या सकाळी जमा करतो, असे सांगितले़ मात्र हॉटेलमध्ये नोकरीवर न येता तसेच ही रक्कम हॉटेलच्या खात्यावर जमा न करता चौधरी याने या रकमेसह तीन दिवसांचे जमा झालेले ६८ हजार रुपये व बुकिंगसाठी दिलेले दोन लाख असा २ लाख ६८ हजार रुपयांचा अपहार करून फरार झाला़
या प्रकरणी शर्मा यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात हॉटेलचा जनरल मॅनेजर चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.