नाशिक : शहरातील बहुचर्चित वाहनांचा टोईंग ठेका मंजूर झाला आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून (दि.6) करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या टोईंगनंतर पोलीस, वाहनधारकांत पुन्हा एकदा रस्त्यांवर वादविवाद उद्भवण्याची श्यक्यता वर्तवली जात आहे.येत्या ६ जुलै २०२१ पासून शहरातील विविध मार्गांवर वाहतूक शाखेने मंजूर केलेल्या टोईंग ठेक्याला सुरुवात होत आहे. त्यासाठी लागणाऱ्या कार्यादेशावर पोलीस आयुक्तांनी सही केली असून वाहतूक शाखेने मनपाकडूनही कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करुन घेतली आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सीताराम गायकवाड यांनी दिली आहे.शहरात वाहनांची संख्या वाढल्याने वाहनतळाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच काही वाहनचालक बेशिस्तपणे वाहने ररस्त्याच्या कडेला उभी करीत असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. टोइंग व्हॅन कारवाईबाबत हरकती, समस्या, सूचना असल्यास त्या नोंदवण्यासाठी नागरिकांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत केवळ दोनच सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्याने अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे....असे असणार टोईंगचे दरदुचाकी वाहने : एकूण २९० रुपये ( टोइंग दर- ९० व शासकीय शुल्क २०० रु.)चारचाकी वाहने : एकूण ५५० रुपये ( टोइंग दर- ३५० व शासकीय शुल्क २०० रु.