पेट्रोलपंप कर्मचा-यास जबर मारहाण करून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:05 AM2018-03-11T00:05:07+5:302018-03-11T00:05:07+5:30

नाशिक : पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी पेट्रोलपंपावरील कामगारास जबर मारहाण करून त्याच्याकडील १९ हजार ५०० रुपयांची रक्कम लुटल्याची घटना शुक्रवारी (दि़९) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास सातपूरच्या कामगारनगरमधील रिलायन्स पेट्रोलपंपावर घडली़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित दुचाकीचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांचा शोध सुरू आहे़

nashik,petrol,pump,Robbery | पेट्रोलपंप कर्मचा-यास जबर मारहाण करून लूट

पेट्रोलपंप कर्मचा-यास जबर मारहाण करून लूट

Next
ठळक मुद्दे १९ हजार ५०० रुपयांची रक्कम लुट सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा

नाशिक : पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी पेट्रोलपंपावरील कामगारास जबर मारहाण करून त्याच्याकडील १९ हजार ५०० रुपयांची रक्कम लुटल्याची घटना शुक्रवारी (दि़९) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास सातपूरच्या कामगारनगरमधील रिलायन्स पेट्रोलपंपावर घडली़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित दुचाकीचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांचा शोध सुरू आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूरच्या कामगारनगर येथील रिलायन्स पेट्रोलपंपावर अर्जुन ताकतोडे (२३) हा कर्मचारी कामास आहे़ शुक्रवारी रात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास ताकतोडे हा रात्रपाळीस असताना पांढºया रंगाची अ‍ॅक्टिवा दुचाकी ढकलत दोन संशयित आले़ त्यांनी पेट्रोल टाकण्याचा बहाणा केला व दुचाकीत पेट्रोल टाकलेच नाही, असे म्हणत कर्मचारी ताकतोडे याच्यासोबत वाद घालून मारहाण सुरू केली़ यानंतर संशयितांपैकी एकाने कर्मचाºयाच्या खिशातील १९ हजार ५०० रुपयांची रक्कम बळजबरीने खिशातून काढून घेतली व पसार झाले़

या घटनेची माहिती ताकतोडे याने सातपूर पोलीस व पोलीस नियंत्रण कक्षास दिल्यानंतर पोलीस अधिकारी पेट्रोलपंपावर आले़ त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अ‍ॅक्टिवा दुचाकीचा नंबर व संशयितांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान, या प्रकरणी कर्मचारी अर्जुन ताकतोडेच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik,petrol,pump,Robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.