केनियाचा मीकियास, कोलकात्याची श्यामली सिंग ‘नाशिक पोलीस मॅरेथॉन'चे विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 08:34 PM2018-02-18T20:34:25+5:302018-02-18T21:25:22+5:30

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘वाहतूक सुरक्षितता व सामाजिक सलोखा’ संदेशासाठी रविवारी (दि़१८) आयोजित ‘नाशिक पोलीस मॅरेथॉन - २०१८’ मध्ये सुमारे पंधरा हजार नाशिककर धावले़ गत तीन वर्षांपासून आयोजित केल्या जाणाºया या मॅरेथॉनमध्ये यावर्षी प्रथमच ४२ किलोमीटरचा अंतर्भाव करण्यात आला़ या ४२ किलोमीटर अर्थात पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांमध्ये केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू मीकियास योमाटा लेमीओमू याने २ तास ३१ मिनिटे तर महिलांमध्ये कोलकाताची धावपटू श्यामली सिंगने ३ तास दोन मिनिटांची वेळ नोंदवत बाजी मारली़ २१ किलोमीटर (अर्थमॅरेथॉन)पुरुषांमध्ये रणजित मेहता तर महिलांमध्ये नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे हिने जिंकली़

nashik,police,marathon,Kenya,Mikios, kolkata,Shyamali,Singh,winner | केनियाचा मीकियास, कोलकात्याची श्यामली सिंग ‘नाशिक पोलीस मॅरेथॉन'चे विजेते

केनियाचा मीकियास, कोलकात्याची श्यामली सिंग ‘नाशिक पोलीस मॅरेथॉन'चे विजेते

googlenewsNext
ठळक मुद्देपंधरा हजार नाशिककर धावले मोनिका आथरे, रणजित मेहता अर्धमॅरेथॉनचे विजेते

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘वाहतूक सुरक्षितता व सामाजिक सलोखा’ संदेशासाठी रविवारी (दि़१८) आयोजित ‘नाशिक पोलीस मॅरेथॉन - २०१८’ मध्ये सुमारे पंधरा हजार नाशिककर धावले़ गत तीन वर्षांपासून आयोजित केल्या जाणाºया या मॅरेथॉनमध्ये यावर्षी प्रथमच ४२ किलोमीटरचा अंतर्भाव करण्यात आला़ या ४२ किलोमीटर अर्थात पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांमध्ये केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू मीकियास योमाटा लेमीओमू याने २ तास ३१ मिनिटे तर महिलांमध्ये कोलकाताची धावपटू श्यामली सिंगने ३ तास दोन मिनिटांची वेळ नोंदवत बाजी मारली़ २१ किलोमीटर (अर्थमॅरेथॉन)पुरुषांमध्ये रणजित मेहता तर महिलांमध्ये नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे हिने जिंकली़

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे गत तीन वर्षांपासून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते़ यावर्षीच्या मॅरेथॉनमधून नागरिकांना ‘वाहतूक सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा’चा संदेश देण्यात आला़ रविवारी पहाटेच्या गुलाबी थंडीत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, सिनेअभिनेत्री संयमी खेर, अभिनेता चिन्मय उद्गीरकर, महंत बिंदू महाराज, भक्ती चरणदास महाराज यांच्यासह विविध धर्मगुरु, राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या सचिव विनिता सिंगल, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून तसेच स्पर्धकांना झेंडा दाखवून ‘नाशिक मॅरेथॉन'ला दिमाखात प्रारंभ झाला.

रविवारी भल्या पहाटेच्या थंडीतही नाशिककर गोल्फ क्लब मैदानावर उपस्थित होते़ पहाटे पाच वाजता ४२ किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉनला मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला़ यानंतर स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांसाठी गोल्फ क्लब मैदानावर झुंबा डान्सद्वारे वार्मिंगअप करून घेण्यात आला़ यानंतर सकाळी सहा वाजेच्या सुमारास महिला व पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉन (२१ किलोमीटर) स्पर्धेला पालकमंत्री महाजन, सिनेअभिनेत्री संयामी खेर, चिन्मय उद्गीरकर यांनी झेंडा दाखविला़ यानंतर सकाळी साडेसहा वाजता १० किलोमीटर अंतरासाठी धावणाºया महिला व पुरुष गटास विविध धर्मगुरुंच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला़ सकाळी पावणेसात वाजता ५ किलोमीटर महिला व परुष व त्यांनतर ३ किलोमीटर अंतर गटातील स्पर्धेस झेंडा दाखविण्यात आला़

गोल्फ क्लब मैदानावर उभारण्यात आलेले आकर्षक व्यासपीठावरून फिटनेस गुरू मिकी मेहता यांनी स्पर्धेकांना फिटनेसचे धडे दिले़ मॅरेथॉनमधील स्पर्धकांना ढोल पथक, विविध शाळांचे विद्यार्थी प्रोत्साहन देत होते़ विद्यार्थी व शहरातील विविध सेवाभावी संस्था वाहतुक नियमांची जनजागृती करीत होते़ ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच एनर्जी ड्रिंकचीही सोय करण्यात आली होती़ गोल्फ क्लब मैदानावर बक्षीस वितरणापुर्वी विविधा शाळांनी मनोरंजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले़ दरम्यान, पोलीस दलातर्फे आयोजित मॅरेथॉनचा नाशिककरांनी आनंद घेतला असला तरी तांत्रिक अडचणींमुळे निकालास उशिर झाल्याने आयोजनातील त्रूटी समोर आल्या़ यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, नमिता कोहोक, क्रीडाप्रशिक्षक विजेंद्रर सिंग उपस्थित होते़


पालकमंत्री, जिल्हाधिकारीही स्पर्धेतजिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केवळ स्पर्धेचे उद्घाटन केले नाही तर स्वत: १० किलोमीटर धावले़ याबरोबच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी़ अपर पोलीस महासंचालक व तत्कालीन माजी पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी अर्धमॅरेथॉन (२१ किमी), ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी १० किलोमीटरमध्ये सहभाग घेऊन स्पर्धा पूर्ण केली़ या सर्वांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़


‘झिंगाट’ गाण्यावर थिरकले परदेशी पर्यटक


नाशिक मॅरेथॉन पाहण्यासाठी सुमारे पंचवीस विदेशी पर्यटक गोल्फ क्लब मैदानावर उपस्थित होते़ यावेळी एका पोलीस कर्मचाºयाने सैराट या चित्रटातील गायलेल्या ‘झिंग-झिंग-झिंगाट’ या गाण्यावर व्यासपीठावर येऊन ताल धरला होता़


आरोग्यांचा कुंभमेळा
सुदृढ आरोग्यासाठी सकाळी नियमितपणे व्यायाम व चालणे आवश्यक आहे़ नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतो, त्यामध्ये आता मॅरेथॉन स्पर्धांची भर पडली असून आजची मॅरेथॉनमध्ये आरोग्यांचा कुंभमेळाच आहे़
- गिरीश महाजन, पालकमंत्री, नाशिक़

माझे तारुण्य आठवले


नाशिककरांची आरोग्याप्रती जागरुकता व उर्जा बघून आनंद वाटला़ यामुळे मला माझे तारुण्य आठवले असून असे स्पिरीट यापुर्वी मी बघितले नव्हते़
- स्मृती बिश्वास- नारंग, सिनेअभिनेत्री़

Web Title: nashik,police,marathon,Kenya,Mikios, kolkata,Shyamali,Singh,winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.