गटबाजीच्या तक्रारीतून नाशिकचे मंत्रीपद हुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:37 PM2018-01-11T14:37:13+5:302018-01-11T14:38:38+5:30

नाशिक शहरात भाजपाचे तीन आमदार निवडून आलेले असले तरी, या सर्वांमध्ये बाळासाहेब सानप सर्वांर्थाने वरचढ ठरले असून, त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून पक्षावर ताबा तर मिळविलाच परंतु पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून शासकीय यंत्रणेवरही आपला धाक निर्माण केला आहे. पक्ष संघटनेची धुरा त्यांच्या खांद्यावर असल्यामुळे नियुक्त्या,

Nashik's minister will be dropped from the gang-rape complaint | गटबाजीच्या तक्रारीतून नाशिकचे मंत्रीपद हुकणार

गटबाजीच्या तक्रारीतून नाशिकचे मंत्रीपद हुकणार

Next
ठळक मुद्देराणें नकोचा सूर : मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने पेच गडदआगामी मंत्रीपदापासून सानप यांचा पत्ता कट करणे हाच असल्याचा हेतू लपून राहिलेला नाही. 

नाशिक : शहरातील तीन आमदारांचे तीन दिशेला असलेली तोंडे व त्यातुन एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडता स्वत:चे घोडे दामटवण्यातील अग्रेसरपणातून उफाळून आलेली भाजपांतर्गंत गटबाजीला आळा घालण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागल्यामुळे त्याचा परिणाम थेट नाशिकला मिळू (?) पाहणा-या मंत्रीपदावर गंडातर येण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. विधानपरिषदेवर नाशिकमधून जाण्याचे स्वप्न पाहणाºया नारायण राणे यांना याच कारणावरून पक्षांतर्गंंत छुपा विरोध करून मंत्रीपदासाठी लॉबींग करताना वाढीस लागलेली गटबाजी एकमेकांचे पत्ते कापण्यासाठी मारक ठरणार आहे.
नाशिक शहरात भाजपाचे तीन आमदार निवडून आलेले असले तरी, या सर्वांमध्ये बाळासाहेब सानप सर्वांर्थाने वरचढ ठरले असून, त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून पक्षावर ताबा तर मिळविलाच परंतु पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून शासकीय यंत्रणेवरही आपला धाक निर्माण केला आहे. पक्ष संघटनेची धुरा त्यांच्या खांद्यावर असल्यामुळे नियुक्त्या, नेमणूकांमध्ये त्यांचा वरचष्मा असणे साहजिक असले तरी, असे करतांना त्यांनी पद्धतशीरपणे पक्षाच्या अन्य आमदारांना व त्यांच्या समर्थकांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याची प्रचिती महापालिका निवडणूकीत सर्वांनाच आल्याने खºया अर्थाने तेव्हापासूनच गटबाजीला उधाण आले असून, महापौरपद असो वा उपमहापौर सत्तेचे सारी पदे सानप यांनी स्वत:च्या ताब्यात ठेवल्यामुळे महापालिकेच्या कारभारातही त्यांचा हस्तक्षेप ओघाने आल्यामुळे अन्य आमदारांचे महत्व त्यातून कमी झाले आहे. आता तीन वर्षानंतर राज्यमंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा पुन्हा जोर धरू लागल्याने सानप यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याचा छातीठोक दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात असतानाच त्यांच्या विरोधात दोन आमदार व एका खासदाराने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यामागे खरे तर हेच कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सानप यांचे पक्षांतर्गंत वर्चस्व गेल्या अडीच वर्षापासून असून या दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांचे डझनभर नाशिक दौरे झाले आहेत, तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील वरचेवर अनेकवार येऊन गेल्याने त्यावेळी सानप यांच्याविरोधात तक्रारी करण्याची पुरेपूर संधी सानप विरोधकांना उपलब्ध होती, मात्र त्यावेळी सबुरीने घेणा-यांनी आताच तक्रार करण्यामागची खेळी आगामी मंत्रीपदापासून सानप यांचा पत्ता कट करणे हाच असल्याचा हेतू लपून राहिलेला नाही. 

Web Title: Nashik's minister will be dropped from the gang-rape complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.