नाशिककरांसाठी शॉर्ट फिल्म्सची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 04:49 PM2019-03-16T16:49:20+5:302019-03-16T16:52:21+5:30
नाशिक :तरूणाईच्या सर्जनशीलतेचा उत्सव अर्थात ऋत्तम शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलला शनिवार पासुन प्रारंभ करण्यात आला. दि. १६ व १७ मार्च ...
नाशिक:तरूणाईच्या सर्जनशीलतेचा उत्सव अर्थात ऋत्तम शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलला शनिवार पासुन प्रारंभ करण्यात आला. दि. १६ व १७ मार्च अशा दोन दिवस नाशिकमध्ये कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. सुमनचंद्र ग्रुप आणी ऋत्तम प्रॉडक्शन यांनी आयोजित केलेल्या या फेस्टिव्हलला रविवारी(दि.१७) अभिनेते शिवाजी साटम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यानिमित्ताने नाशिककरांना विविध विषयांवरील दर्जेदार शॉर्ट फिल्म्सची मेजवानी लाभणार आहे.
तरु णांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा आणी त्यांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे, या हेतूने या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणच्या युवा फिल्ममेकर्सने या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला आहे. कमाल ३० मिनिटांची कालमर्यादा असलेल्या सुमारे ३० शॉर्ट फिल्म्सचे स्किीनिंग या फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. त्यातून सुहास भोसले, दत्ता पाटील, नंदू घाणेकर आणी सचिन शिंदे यांचे परिक्षक मंडळ विजेत्यांची निवड करणार आहे. सर्वोत्तम शॉर्ट फिल्मला एकवीस हजार रु पये रोख, चषक आणी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. दुसऱ्या क्र मांकाच्या शॉर्ट फिल्मला पंधरा हजार रु पये, तर तिसऱ्या क्र मांकावरील फिल्मला दहा हजार रु पयांचे बक्षीस दिले जाईल. याशिवाय या विजेत्यांना चषक आणी प्रमाणपत्र देऊनही गौरविले जाईल. याशिवाय वैयिक्तक पारितोषिकेही सहभागी फिल्ममेकर्सना दिली जातील. त्यात सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम छायाचित्रणकार, सर्वोत्तम संगीत आण िपाशर््वसंगीत, सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम अभिनेत्री आण िविशेष ज्युरी पारितोषिक म्हणून प्रत्येकी एक हजार रु पये, चषक आण िप्रमाणपत्र बहाल केले जाणार आहे.रविवरी दि. १७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता अभिनेते यांच्या प्रमुख उपस्थीतीत पारीतोषिक वितरण होणार असल्याचे आयोजकांंच्ये वतीने सांगण्यात आले आहे.