नाशकात टोर्इंगसाठी नवीन हायड्रोलिक वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:11 PM2018-01-04T22:11:42+5:302018-01-04T22:14:44+5:30

नाशिक : नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दुचाी व चारचाकी वाहनांना टोर्इंग करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने दाखल झाली आहेत़ या अत्याधुनिक वाहनांवर असलेल्या सीसीटीव्हीमुळे वाहन बेशिस्तपणे उभे केलेले नव्हते या वाहनमालकांच्या आक्षेपास आता थारा असणार नाही़ याबरोबरच या वाहनावरील हायड्रोलिक प्रणालीमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान टळणार असले तरी बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने लावून वाहतूकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनधारकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे़

nashik,toing,New,Hydraulic,vehicles | नाशकात टोर्इंगसाठी नवीन हायड्रोलिक वाहने

नाशकात टोर्इंगसाठी नवीन हायड्रोलिक वाहने

googlenewsNext
ठळक मुद्देटोर्इंग वाहनावर चार सीसीटीव्ही ; तडजोड शुल्कात वाढ

नाशिक : नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दुचाी व चारचाकी वाहनांना टोर्इंग करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने दाखल झाली आहेत़ या अत्याधुनिक वाहनांवर असलेल्या सीसीटीव्हीमुळे वाहन बेशिस्तपणे उभे केलेले नव्हते या वाहनमालकांच्या आक्षेपास आता थारा असणार नाही़ याबरोबरच या वाहनावरील हायड्रोलिक प्रणालीमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान टळणार असले तरी बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने लावून वाहतूकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनधारकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे़
शहरात पार्किंगसाठी पुरेशा जागेचा अभाव असल्याने रस्त्यात कुठेही दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहतात व पर्यायाने वाहतूक कोंडी व अपघातांची संख्या वाढली होती़ यामुळे पोलीस आयुक्तांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये टोइंग ठेकेदार नेमून बेशिस्तपणे रस्त्यावर उभ्या असणाºया वाहनांवर टोइंगची कारवाई सुरू केली. पुवीच्या ठेकेदाराची मुदत संपल्याने निविदा काढून नवा टोर्इंग ठेकेदार नेमण्यात आला आहे़ टोर्इंग कारवाईदरम्यान ठेकेदाराकडील कर्मचारी व वाहतूक पोलिसांसोबतच वाहनचालकांचे वाद होत असल्याने ते टाळण्यासाठी पोलिसांनी ठेकेदारांना नियमावलींची पुर्तता करण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांच्या मागणीसाठी टोर्इंग ठेकेदाराने अत्याधुनिक अशी प्रत्येकी चार टोर्इंग वाहने मागविली आहे़ त्यामध्ये चारचाकी व दुचाकी उचलण्यासाठी वेगवेगळी वाहने असून त्याचे प्रात्यक्षिक गुरुवारी (दि़४) पोलीस आयुक्तालयात दाखविणयात आले़ यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. अजय देवरे आणि वाहतूक ठेकेदार समीर शेटे आदी उपस्थित होते़

टोर्इंग वाहनावर चार सीसीटीव्ही

वाहतुकीस अडथळा होणारी वाहने टोइंग उचलल्यानंतर वाहनचालक आमचे वाहन रस्त्यावर नसताना उचलल्याची तक्रार करीत होते़ मात्र नवीन अत्याधुनिक वाहनांवर चारही बाजूंना एक-एक सीसीटीव्ही असे चार कॅमेरे असणार आहेत़ यामध्ये चारही दिशांचे सुमारे वीस फूटाचे अंतराचे चित्रिकरण केले जाणार असल्याने वाहनचालकांना तक्रार करण्यासाठी वाव राहणार नाही़

तडजोड शुल्कात वाढ

टोर्इंगसाठी आलेल्या अत्याधुनिक हायड्रोलिक वाहनांद्वारे कारवाई केली जाणार असल्याने पुर्वी व आताच्या तडजोड शुल्कात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे़ यापुर्वी दुचाकी वाहनांसाठी शासकीय व ठेकेदार या दोघांचे मिळून १७० रुपये शुल्क आकारले जात होते़ मात्र, तेच आता ३०० रुपये होण्याची शक्यता आहे़ तर चारचाकी वाहनांच्या टोर्इंगपोटी ६५० रुपये घेतले जाणार असून पूर्वी ४५० रुपये घेतले जात होते़

Web Title: nashik,toing,New,Hydraulic,vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.