एसटी वर्कशॉपमध्ये पाण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 05:15 PM2019-08-29T17:15:49+5:302019-08-29T17:17:03+5:30

  नाशिक : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे वर्कशॉप आणि डेपोतील कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा ...

nashik,water,movement,in,workshop | एसटी वर्कशॉपमध्ये पाण्यासाठी आंदोलन

एसटी वर्कशॉपमध्ये पाण्यासाठी आंदोलन

Next


 नाशिक : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे वर्कशॉप आणि डेपोतील कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना असून, त्यांच्या भावनेचा उद्रेक झाला. कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाºयांकडे या संदर्भातील वारंवार तक्रार करूनही पाण्याची टंचाई कायम असल्याने गुरुवारी (दि.२९) सकाळी पेठरोडवरील सर्व कर्मचाºयांनी अचानक आंदोलन छेडले. यामुळे एसटीतील अधिकाºयांची चांगलीच धावपळ झाली.
पेठडरोडवरील एसटी वर्कशॉपमध्ये सकाळपासून पाणी नसल्याची बाब कर्मचाºयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी येथील अधिकाºयांना जाब विचारला. मात्र त्यांना यापैकी काहीच माहिती नसल्याने कर्मचाºयांनी पाणी मिळेपर्यंत निदर्शने करण्याची भूमिका घेत सर्व कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर आले. यावेळी घोषणाबाजी करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अधिकाºयांनी समजूत काढल्यानंतर आंदोलन तूर्तास थांबविण्यात आले आहे.
कर्मचाºयांनी सातत्याने तक्रारी करूनही प्रशासनाकडू दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे कर्मचाºयांचा संताप वाढत गेला आणि अखेर कर्मचाºयांना पाण्यासाठी आंदोलन छेडावे लागले.

Web Title: nashik,water,movement,in,workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.