सुरगाणा तालुक्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 05:39 PM2019-04-15T17:39:03+5:302019-04-15T17:39:56+5:30

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये तीव्र पाणीटंचाई असलेल्या म्हैसमाळ, गळवट, मोरडा ...

nashik,water,supply,through,tankers,surgana,taluka | सुरगाणा तालुक्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

सुरगाणा तालुक्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

Next

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये तीव्र पाणीटंचाई असलेल्या म्हैसमाळ, गळवट, मोरडा व शिरीषपाडा या गावांसाठी खासगी विहिरीवरून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरु षोत्तम ठाकूर यांनी दिली.
सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ, गळवट, मोरडा व शिरीषपाडा या गावांमध्ये दरवर्षी पाण्याची समस्या निर्माण होते. याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यावेळीही २ एप्रिलपासून या गावांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायत माणी अंतर्गत वांगण येथील खासगी विहिरीवरून पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याचे टँकर भरण्यास विलंब होत असल्याने सुरगाणा तालुक्यातील पळसन येथील विहीर अधिग्रहित करण्यात आली असून, तेथून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव गड्डापोड यांनी दिली.
म्हैसमाळ येथे कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून, २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म अंतर्गत तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यात या गावांचा समावेश करण्यात आला असून, गळवड व मोरडा या गावांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे.

Web Title: nashik,water,supply,through,tankers,surgana,taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.