महिला सुरक्षिततेच्या मागणीसाठी ‘मुक आंदोलन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 02:24 PM2018-03-08T14:24:41+5:302018-03-08T14:28:41+5:30
नाशिक : शहरात महिलांवर होणारे आत्याचार आणि अन्यायाच्या प्रमाणात वाढ झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्या उपस्थित झाल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्यावतीने जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक आंदोलन’ करण्यात आले.
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तोंडाला काळ्या फिती बांधून सकाळी ११ वाजता आंदोलन केले
. महिलांनी हातात हिंसा नही सन्मान चाहिये, जीवन का आधार चाहिये, लगातार बलात्कार... फडणवीस सरकार गुनहगार..., हमे चाहिये सुरक्षा...., स्टॉप क्राईम आॅन वुमन...महिलांवर आत्याचार करू नका’ असे फलक हातात घेऊन आंदोलन करण्यात आले.
समाजात महिलांवर होणारे अत्याचार अजूनही संपलेले नाहीत. हुंडाबळी, मानिसक, शारीरिक छळ, भेदभाव आदींच्या माध्यमातून स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. महिलांवर होणा-या अत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आंदोलन करण्यात आल्याची माहिती प्रेरणा बलकवडे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, पुष्पलता उदावंत, नीलिमा काळे, सायरा शेख, मेघा दराडे, पूनम गवळी, पूनम बर्वे, वंदना भामरे, अपर्णा देशमुख, मगंल भालेराव, सायरा शेख, नुरजहॉ मन्सुरी, नंदा वाघमारे, राणी काळशेकर आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या.