नाशिक @ ११ : शहरात थंडीचा चढता आलेख; पहाटे धुक्याची दुलई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 08:19 PM2017-11-28T20:19:44+5:302017-11-28T20:32:36+5:30
किमान तपमान ११ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच मागील आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा अधिक थंड राहिला आहे. गेल्या मंगळवारी शहराचे किमान तपमान १८ अंशापुढे होते.
नाशिक : शहराच्या किमान तपमानाच्या पाºयामध्ये सातत्याने घसरण सुरूच असून, नाशिककरांना थंडीची तीव्रता अनुभवास येत आहे. मागील चार ते पाच दिवसापांसून किमान तपमानाचा पारा घसरत असल्याने शहरात गारठा वाढला आहे. मंगळवारी (दि. २८) शहराचे किमान तपमान ११ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच मागील आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा अधिक थंड राहिला आहे. गेल्या मंगळवारी शहराचे किमान तपमान १८ अंशापुढे होते.
शहराच्या किमान तपमानाचा पारा गेल्या मंगळवारपासून (दि. २२) दोन दिवस चढता राहिला; मात्र त्यानंतर पुन्हा किमान तपमानाचा पारा घसरू लागल्याने थंडीची तीव्रता शहरात वाढल्याचे जाणवत आहे.
रविवारपासून हवेमध्ये कमालीचा गारवा जाणवू लागल्याने पा-यामध्येही घसरण होत आहे. एकीकडे किमान तपमानाचा पारा उतरता असला, तरी दुसरीकडे मात्र कमाल तपमानाचा पारा चढता असल्याने नाशिककरांना दिवसा उन्हाचा चटकाही जाणवत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर हवेत गारवा निर्माण होत असून, थंडी जाणवण्यास सुरुवात होत आहे. एकूणच सध्या नाशिककर हिवाळ्यासोबत उन्हाळाही अनुभवत आहेत. सकाळी १० वाजेपासून नाशिककर उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसभर उकाडाही अनुभवत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वातानुकूलन यंत्रासह पंख्याचा वापर नागरिक दुपारी करत आहेत. संध्याकाळपासून थंडीची तीव्रता जाणवण्यास सुरुवात होते. त्यामुळे गोदाकाठावर व तपोवन परिसरात उघड्यावर राहणाºया भटक्या कुटुंबीयांकडून शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर रोजी किमान तपमानाचा पारा १० अंशापर्यंत घसरला होता. यावर्षी केवळ एक अंशाने यादिवशी पारा चढता राहिला आहे.