राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे चोहीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 05:12 PM2020-08-18T17:12:08+5:302020-08-18T17:13:25+5:30
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर आंबेगण ते सावळ घाट पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ ऊडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर आंबेगण ते सावळ घाट पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ ऊडत आहे.
सदरचा महामार्ग कॉँक्र ीटीकरण होण्यापुर्वी आंबेगाण ते सावळघाटाच्या माथ्यापर्यंत झालेला डांबरीकरण महामार्ग पहिल्याच पावसात खड्डेमय झाला असून रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता तेच कळत नाही. एवढे मोठे खड्डे पडले आहेत की, छोटी वाहने अक्षरश: खड्यात अडकून पडतांना दिसतात. यामूळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करण्याबरोबर वाहनांचे नुकसान होत आहे. अवघे चार किमीचे अंतर पार करतांना वाहनधारकांची पाचावर धारण बसत असून या रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.