बोरस्ते विद्यालयात राष्ट्रीय एकता दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 10:08 PM2020-02-01T22:08:32+5:302020-02-02T00:19:25+5:30
माधवराव बोरस्ते विद्यालयात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात झाला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक सुरेखा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
ओझर : येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात झाला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक सुरेखा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयात सरदार पटेल यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपशिक्षक बाळासाहेब ढेपले यांनी मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारा आयोजित जिल्हा आंतरशालेय नाट्य स्पर्धेत बोरस्ते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अंगाई या सर्वोत्कृष्ट नाटकास प्रथम क्र मांक चषक व रोख रुपये दहा हजारांचे पारितोषिक मिळविले. या नाटकातील सहभागी विद्यार्थी साई देशमुख, गौरी पवार, कुणाल सिन्नरकर, आदित्य पवार, दर्शन मोरे, शेखर ज्ञानेश्वरी, प्रतीक्षा भरवीरकर, गायकवाड, दीक्षा शिरसाट, वैष्णवी ठोंबरे, सानिका शिरापुरे, दामिनी माळोदे. विद्यालयातील शिक्षक शकुंतला आगळे व शीतल हांडोरे यांनी मार्गदर्शन केले. हवा हवी हवेत या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला. या नाटकास रोख सात हजार पाचशे रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात
आले.