डुबेरे माध्यमिक विद्यालयात राष्टÑीय एकता दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 10:05 PM2020-02-01T22:05:02+5:302020-02-02T00:19:50+5:30
सिन्नर येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला.
सिन्नर : येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला.
प्राचार्य सोपान येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रकाश जाधव, भाऊसाहेब सहाणे, सोमनाथ गिरी, पोपट कांबळ, बाळासाहेब वारुंगसे, मंजूषा आहेर, एकनाथ खैरनार, कचेश्वर शिंदे, रामदास वारुंगसे, रेखा खंडीझोड, सोमनाथ पगार, राजश्री बोडके ,मारु ती डगळे, विद्यार्थी प्रतिनिधी दीक्षा वाघ आदींच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. राजेंद्र गांगुर्डे यांनी सरदार वल्लभभाई यांच्या जीवनकार्य परिचय करून दिला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान वल्लभभाई पटेल यांनी दिले असून, त्यांच्या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन प्राचार्य येवले यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन पांडुरंग कर्पे यांनी, तर आभार एकनाथ खैरनार यांनी मानले. सोमनाथ गिरी, किरण शिंदे, सुषमा थोरात, सीमा गोसावी, डोंगरसिंग रबडे, विजय कोकाटे, जयश्री गोहाड, संजय सदगीर, रावसाहेब घुमरे, राणी शिंदे, किशोर शिंदे, सुनील पवार, रवि गोजरे, अनिल काळे, मधुकर रोडे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.