हमीभावासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने रोखला महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:34 PM2018-03-19T14:34:05+5:302018-03-19T14:34:05+5:30
उमराणे -: भाजपा-शिवसेना युती सरकारने तातडीने कांदा, टोमॅटो यांच्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
उमराणे -: भाजपा-शिवसेना युती सरकारने तातडीने कांदा, टोमॅटो यांच्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतुक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. कांद्याला ४०० ते ६०० तर २० किलो टोमॅटोच्या जाळीला अवघे ५० रु पये एवढी कवडीमोल किंमत मिळत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी सांगितले. कांद्याचे निर्यात मुल्य शून्य असतांना देखील निर्यात धोरणांबाबत भाजप-शिवसेना युती सरकारच्या धरसोड वृत्तीमुळेच भारतीय कांद्याला मागणी कमी झाली असल्याचा आरोपही रविंद्र पगार यांनी यावेळी केला. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारने तातडीने जागे होवून कांद्याला किमान अडीच हजार रु पये हमी भाव जाहीर करावा अशी मागणी देखील पगार यांनी केली. यावेळी कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ, सदस्य डॉ.भारती पवार, नूतन अहेर, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष रामा पाटील, देवळा तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, चांदवडचे तालुकाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड, नांदगावचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, कळवणचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, मनमाडचे शहराध्यक्ष राजेंद्र पगारे, जिल्हा सरचिटणीस जगदिश पवार, नितीन मोहिते, योगेश आहेर, उषा बच्छाव, सुनील आहेर, राजेंद्र देवरे, धर्मा देवरे, खंडेराव आहेर आदींची भाषणे झाली.