घोटी : इगतपुरी तालुक्यातील आवळखेड या आदिवासी गावातील ग्रामस्थ पाणीटंचाईपासून कायमची मुक्ती मिळण्यासाठी सरसावले आहेत. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन श्रमदान करून सार्वजनिक विहिरीत पाणी पोहोचविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीच्या आदर्श ग्रामयोजनेतून आवळखेड ग्रामस्थांच्या पंखात बळ भरण्यात आले आहे. आगामी पाणीटंचाईवर यशस्वी मात करण्यासाठी झटणाऱ्या आवळखेड ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक सुरू आहे. एक हजारपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या आणि सहा आदिवासी वाड्यांना यामुळे फायदा होणार आहे.इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीने आवळखेड गावाची पाणीटंचाई कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी गावाचा समावेश आपल्या आदर्श ग्रामयोजनेत केला. यामध्ये आदिवासी ग्रामस्थांचा लोकसहभाग झाल्यास पाण्याचे महत्त्व अधोरेखित होईल म्हणून दिलासा जनविकास संस्थेने आवळखेड ग्रामस्थांचे वेळोवेळी प्रबोधन केले. ग्रामसेवक रूपाली जाधव यांनी ग्रामसभेत ठराव मंजूर केला. सर्व ग्रामस्थांनी ठरावाच्या बाजूने उभे राहून अनुमोदन दिले होते.त्यानुसार गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे पुनर्भरण करण्याची आवश्यकता असल्याने ग्रामस्थांनी श्रमदान करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. आज सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सार्वजनिक विहिरीपर्यंत सीमेंट प्लग बंधाºयातील पाणी आणण्यासाठी पाइपलाइन खोदाईच्या श्रमदानाला सरसावले. इगतपुरी महिंद्राचे जयंत इंगळे, राजेंद्र मुठाळ, पंकज भामरे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी श्रमदानाला प्रारंभ केला. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण करण्यासाठी आवळखेड ग्रामस्थ झपाटून कामाला लागले आहेत. यावर्षी यामुळे आवळखेड ग्रामस्थ पाचवीला पूजलेल्या पाणीटंचाईपासून मुक्त होणार आहेत. आवळखेड येथील सरपंच मांगीबाई शिद, उपसरपंच भागूबाई पवार, ग्रामसेवक रूपाली जाधव, ग्रामस्थ सोनू शिद, नागनाथ लोते, मंगळू कामडी, दादू गावंडा,मंगळू भगत, खंडू रेरे यांच्यासह काराचीवाडी, जांभूळवाडी, रेरेवाडी, चांदवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदानात सहभाग घेतला.ग्रामस्थांचा पाणीटंचाईशी सामनाया महिन्यापासून इगतपुरी तालुक्याच्या अनेक गावांत तीव्र पाणीटंचाईला नागरिक सामोरे जातात. डोंगराळ भागातील गावांना पाण्यासाठी तीन ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागते. आवळखेड या गावालाही दरवर्षी भयानक पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याचा स्रोत असणारी सार्वजनिक विहीर कोरडी पडते. यामुळे आदिवासी ग्रामस्थ दरवर्षी कंटाळतात.आवळखेड परिसरात उन्हाळ्यातील चार महिने पाणीटंचाईची समस्या भेडसावत असते. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात तर आदिवासी कुटुंबातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी दमछाक करावी लागत होती. महिंद्राचे सहकार्य आणि ग्रामस्थांचे श्रमदान यामुळे गाव पाणीटंचाईमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.- रूपाली जाधव,ग्रामसेवक, आवळखेडआवळखेड गावातील सार्वजनिक विहीर उन्हाळ्यात कोरडी पडते. आमच्या ग्रामस्थांना यामुळे कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. श्रमदानातून काम करणार असल्याने आमचे गाव पाणीटंचाईमुक्त होणार असल्याचा आनंद वाटतो.- मांगीबाई शिद, सरपंच आवळखेड.
आवळखेडची टंचाईमुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:23 AM
घोटी : इगतपुरी तालुक्यातील आवळखेड या आदिवासी गावातील ग्रामस्थ पाणीटंचाईपासून कायमची मुक्ती मिळण्यासाठी सरसावले आहेत. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन श्रमदान करून सार्वजनिक विहिरीत पाणी पोहोचविण्यासाठी सक्रिय झाले आहेत.
ठळक मुद्देआदिवासी लोकसंख्या आणि सहा आदिवासी वाड्यांना यामुळे फायदा होणार