गंगापूर : ऐतिहासिक पेशवेकालीन असलेले गंगापूररोडवरील नवश्या गणपती मंदिर संस्थानच्या वतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करून आलेल्या भक्तजणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नवश्या गणपती मंदिरातील गणेशमूर्तीचा ब्रह्मगिरी येथून उगम पावणाऱ्या गोदावरी नदीच्या तीर्थाने पहाटे अभिषेक करण्यात आला. रामेश्वर मंदिरापासून आनंदवली गाव परिसर ते नवश्या गणपती मंदिरापर्यंत पालखी काढण्यात आली. याप्रसंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव, मंगेश गलांडे, लता शिंदे यांसह ट्रस्टचे संचालक व पुजाºयांचे सहकार्य लाभले. दरम्यान, सिडको, सातपूरमधील गणेशभक्त या पालखीला सकाळपासून उपस्थित होते. पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण होते. या पालखीत महिलांचा सहभाग अधिक होता. महिलांनी पालखी खांद्यावर घेत मिरविली. दिवसभर धार्मिक उत्सव साजरे करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे, शिवसेना गटनेते विलास शिंदे, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, सुधाकर बडगुजर, रेखाताई बेंडकुळे, सीमाताई निगळ, भटू शिंदे, दीपक वाघचौरे, हिरामण बेंडकुळे, समाधान साळवे, शरद बेंडकुळे, उषाताई बेंडकुळे, दिनेश सूर्यवंशी, परेश सातव, रवींद्र जाधव, अरु ण पाटील, बाळासाहेब लांबे आदींसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवश्या गणपतीची पालखी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:49 PM