नाशिक- केंद्र सरकारने विकासाच्या आणि रोजगाराच्या केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ जनतेला एप्रिल फुल आहे अशी घोषणाबाजी करत शनिवारी (दि.१) शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने विकासाच्या नावे एप्रिल फूल आंदोलन करण्यात आले.
शहर अध्यक्ष अंबादास खैरे व कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृवाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात ‘मोदी सरकार रोजगार कधी मिळणार?’ अशा आशय असलेला केक कापण्यात आला. १ एप्रिलचे औचित्य साधत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत फसव्या विकासाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विकासाच काय झालं ? एप्रिल फुल , रोजगाराच काय झालं ? एप्रिल फुल, दोन कोटी नोकऱ्यांच काय झालं ? एप्रिल फुलच्या घोषणा बाजी करत आंदोलन करण्यात आले.