राष्ट्रवादीतर्फे दिंडोरीत हल्लाबोल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 05:14 PM2017-11-27T17:14:54+5:302017-11-27T17:16:55+5:30
दिंडोरी : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत शिवसेना भाजप युतीने सत्ता मिळवली मात्र तीन वर्षे झाले तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला असून जनता आता त्यांच्या खोटरडेपणाला कंटाळली असून सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरत सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले असून जनता आता या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी दिंडोरी येथे केले.

गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप ङ्क्तशिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देवून युती सरकारने जनतेची फसवणूक केलेली आहे सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचे प्रदेशाद्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला त्यावेळी तटकरे बोलत होते.
दुपारी साडेबाराच्या दरम्यान दिंडोरी नाशिक कळवण रस्त्यावरील रंणतल येथील वृंदावन गार्डन येथून भव्य हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला . मोर्चाचे नेतृत्व तटकरे यांनी केले. मोर्चात कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार,,आमदार नरहरी झिरवाळ ,आमदार जयंत जाधव, दीपिका चव्हाण, जयंत जाधव, माजी आमदार दिलीप बनकर, संजय चव्हाण, माजी खासदार देविदास पिंगळे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, कृऊबा सभापती दत्तात्रेय पाटील,महिला आघाडी अद्याक्ष प्रेरणा बलकवडे,भारती पवार,रंजन ठाकरे,प्रकाश वडजे,गजानन शेलार,बाळासाहेब जाधव,भास्कर भगरे,राजेंद्र उफाडे,अविनाश जाधव,सचिन देशमुख,डॉ योगेश गोसावी,शाम हिरे,गंगाधर निखाडे ,कैलास मवाळ आदींसह हजारो कार्यकर्ते सुमारे चार किलोमीटर पायी मोर्चात सहभागी झाले. मोर्चात काही शेतकरी बैलगाडीसह सहभागी झाले होते.ढोल ताशांच्या गजरात सरकार विरोधात घोषणा देत एक तासाने हल्लाबोल मोर्चा दिंडोरी तहसील कार्यालयावर धडकला . तेथे सभा होत सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात शिवसेना भाजप युतीच्या सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला.