नाशिक : भागात स्वच्छतेविषयक काम करताना सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनावर अधिक भर देण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामविकास आराखड्यातील निधीतून स्वच्छ व सुंदर गावासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने शनिवारी (दि. १९) महिरावणी जवळील संदीप फाउण्डेशन येथे गोदाकाठावरील ग्रामपंचायती व रूरबन प्रकल्पातील ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, उप अभियंता यांच्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेस आय.आय.टी. मुंबई येथील प्रा. इंद्रर्कांत झा, प्रा. अनिल दीक्षित, प्रा. प्रशांत पाटील आदि उपस्थित होते. डॉ. नरेश गिते म्हणाले, सांडपाण्यामुळे गोदावरी नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोदाकाठावरील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवून नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी काम करण्यात येणार आहे. यासाठी एच.ए.एल. कारखाना काही गावांसाठी सि.एस.आर. मधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर इंद्रकांत झा यांनी सांडपाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करताना देशातील सांडपाणी प्रक्रियेची माहिती दिले. प्रास्ताविक इशाधिन शेळकंदे यांनी केले.१८ टक्के कचऱ्यावरच प्रक्रियादेशात निर्माण होणाºया कचºयापैकी केवळ १८ टक्के कचºयावरच प्रक्रिया केली जात असल्याचे प्रा. अनिल दीक्षित यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत माहिती देताना सांगितले. देशात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो मात्र शहरांमध्ये केवळ कंपोस्ट आणि डंपिग एवढीच प्रक्रिया केली जाते. कचºयापासून वीज देखील तयार करता येते. सुका आणि ओला कचरा यांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत तसेच देशात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या प्रकल्पांची त्यांनी यावेळी माहिती दिली.
स्वच्छ, सुंदर गावासाठी प्रयत्न करण्याची गरज: नरेश गिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 1:08 AM
भागात स्वच्छतेविषयक काम करताना सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनावर अधिक भर देण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामविकास आराखड्यातील निधीतून स्वच्छ व सुंदर गावासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.
ठळक मुद्देसंदीप फाउण्डेशनमधील कार्यशाळेत ग्रामपंचायतींना आवाहन