नांदगावला जनावरांना कडुनिंबाचा पाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:41 PM2019-05-21T18:41:06+5:302019-05-21T18:41:22+5:30
चाराटंचाई : अद्याप एकही चाराछावणी नाही
नांदगाव : नांदगाव तालुक्यात वैरणीवाचून जनावरांचे हाल सुरू असून, अद्याप एकही चाराछावणी किंवा चारा डेपो सुरू न झाल्याने पशुपालकांवर जनावरांना कडुनिंबाचा पाला खाऊ घालण्याची वेळ आली आहे.
जनावरांच्या वैरणीचा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, राज्यात इतरत्र चारा छावण्या व डेपो सुरू झाले आहेत; पण नांदगाव तालुक्यात अद्याप एकही चारा छावणी किंवा डेपो सुरू नाही त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने कडुनिंबाचा पाला वैरण म्हणून खाऊ घालत आहेत. चारा छावण्या किंवा डेपो सुरू करण्याची मागणी चांदोरा, ढेकू ,नांदगाव, बाणगाव, साकोरा आदींसह अनेक गावांनी केली असताना मे महिना संपत आला तरीदेखील शासनाचा प्रतिसाद नाही. दरम्यान, चाऱ्यासाठी येथील सामाजिक संस्था छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळाने पुढाकार घेतला आहे.