नेटवर्कअभावी मानोरीत मोबाईल यंत्रणा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 06:07 PM2019-03-16T18:07:16+5:302019-03-16T18:07:45+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बु. गावात कोणत्याही कंपनीच्या सीम कार्डला नेटवर्क मिळत नसल्याचे ‘एका अर्थी नो नेटवर्क गाव’ अशी गावाची ओळख होवू लागली आहे.
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बु. गावात कोणत्याही कंपनीच्या सीम कार्डला नेटवर्क मिळत नसल्याचे ‘एका अर्थी नो नेटवर्क गाव’ अशी गावाची ओळख होवू लागली आहे.
अनेकदा प्रसारित करून देखील संबधित कोणत्याही कंपनी कडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने मोबाईल धारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागील दीड वर्षापासून मानोरी बु गावात कोणत्याही कंपनीच्या सीम कार्डाला पुरेसे नेटवर्क मिळत नसल्याने फोन आल्यानंतर स्पष्ट आवाज न येणे , दुसऱ्या मोबाईल धारकाला आवाज न जाणे तसेच इंटरनेट कनेक्शन फेल दाखवत आहे.
असा प्रकार वारवार घडत असल्याने महागडे रिचार्ज वाया जाण्याच्या घटनेमुळे मोबाईल धारक संबधीत सीमच्या कंपनीवर नाराजी व्यक्त करत आहे. अनेकदा इंटरनेट कनेक्शन सूरु केल्यानतर एखादी लिंक ओपन करण्यास टाकली असता कमी नेटवर्क अभावी लिंक उघडण्यास बराच कालावधी लागत आहे.
कधी कधी लिंकच ओपन होत नसते. मोबाईल धारकांना नेटवर्कचा शोध घेण्यासाठी उंच ठिकाणाचा आसरा घेण्याची वेळ येत आहे. सध्या मार्च अखेर सर्व शासकीय कामे आॅनलाईन पद्धतीणे पूर्ण करावी लागतात त्यात मानोरीत नेटवर्कनसल्याने ग्रामपंचायत मध्ये कामे आॅनलाईन करण्यास नेटवर्कचा तुटवडा जाणवत असल्याने आॅनलाईन कामे पूर्ण कशी पूर्ण करावी असा प्रश्न ग्रामस्थांकडून होत आहे. संबधित सीमच्या सर्व कंपल्ल्रँिंल्लन्यांनी मानोरीत नेटवर्क चा सर्वे करून मानोरीत नवीन टावर उभा करून नेटवर्क चा प्रश्न सोडवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.