नवे संशोधन : नाशिकच्या अधिव्याख्यात्याचा प्रयोग

By admin | Published: July 10, 2016 12:42 AM2016-07-10T00:42:08+5:302016-07-10T00:48:46+5:30

आपत्ती घडताच यंत्रणा होणार सतर्क

New research: Experimentation of Nashik Advisory | नवे संशोधन : नाशिकच्या अधिव्याख्यात्याचा प्रयोग

नवे संशोधन : नाशिकच्या अधिव्याख्यात्याचा प्रयोग

Next

नाशिक : नैसर्गिक आपत्ती कोणाला सांगून येत नाही. त्यामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असते. निसर्गाच्या प्रकोपाची घडता क्षणीच किंवा काही क्षण अगोदर पूर्वसूचना मिळाली तर लाखो लोकांचे जीव वाचू शकतील. हीच गरज ओळखून नाशिकमध्ये नैसर्गिक आपत्तीची माहिती आता स्मार्टवर उपलब्ध करून देणारी यंत्रणा विकसित करण्याचा प्रयोग सध्या नाशिकमध्ये सुरू आहे.
नाशिकमधील अभियांत्रिकी शाखेचे प्राध्यापक विपीनकुमार पवार यांनी ही यंत्रणा विकसित केली असून, या यंत्रणेची प्रमाणबध्दता आणि कार्यक्षमता यांची सध्या चाचणी सुरू असून हे उपकरण डिसेंबर २०१६ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्याचा मानस पवार यांनी व्यक्त केला आहे. या उपकरणामुळे नैसर्गिक आपत्तीची सूचना आपल्या स्मार्टफोनवर मिळणेदेखील आता शक्य होणार आहे. ज्या भागांमध्ये नैसर्गिक आपत्ती वारंवार घडतात, अशा ठिकाणी या उपकरणाचा उपयोग फायदेशीर ठरणार आहे, तसेच या उपकरणामुळे माळीण दुर्घटनेसारखी पुनरावृत्तीदेखील टाळण्यास मदत होईल. मुंबई विद्यापीठात रिमोट सेन्सिंग या विषयावर पीएच.डी. करताना त्यांनी हा विषय निवडला असून, त्यासाठीच ही लॅब तयार केली आहे. ‘मेरी’सारख्या ठिकाणी भूकंपमापन उपकरण असते. तसेच या प्रयोगात आहे. कोणतीही घटना टाळता येणे शक्य नसले तरी ती घटना घडल्याक्षणीच म्हणजे नागरी जिवांवर आघात होण्याआधीच या यंत्रणेव्दारे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा मग ती पोलीस ठाणे असो की एखादे रुग्णालय त्यांना कळू शकते. तसे उपकरण या आस्थापनांमध्ये ठेवले जाते. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व वायरलेस उपकरण असून त्यामुळे आपत्तीत भ्रमणध्वनी मनोरे बाधीत झाले तरी ही यंत्रणा अस्तित्वात राहू शकते, असा दावा प्रा. पवार यांनी केला आहे.
या उपकरणामुळे जीवित तसेच स्थावर मालमत्तेचे संरक्षण होण्यास मदत होणार असून, या यंत्रणेमुळे पोलीस, अग्निशामक दल, रुग्णालयांना त्याबाबतचा संदेश प्राप्त होणार आहे. तसेच अशा प्रवण क्षेत्राच्या सभोवताली असणाऱ्या गावांनादेखील सतर्क राहण्याच्या दृष्टीने हे उपकरण फायदेशीर ठरणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.
वीजवाहिन्यांवर झाडाच्या फांद्या
देवळा : शहरातील रामराव हाऊसिंग सोसायटी परिसरात वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने शॉर्टसर्किट होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: New research: Experimentation of Nashik Advisory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.