मालेगाव बाह्य विधानसभेचा पुढील आमदार भाजपचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:47+5:302021-07-23T04:10:47+5:30
मालेगाव : भारतीय जनता पार्टी पंढरपुरातील पुनरावृत्ती मालेगाव बाह्य मतदारसंघात केल्याशिवाय राहणार नाही. मालेगाव बाह्य मधील ...
मालेगाव : भारतीय जनता पार्टी पंढरपुरातील पुनरावृत्ती मालेगाव बाह्य मतदारसंघात केल्याशिवाय राहणार नाही. मालेगाव बाह्य मधील पुढचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचाच असणार , पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तयार राहण्याचे आवाहन माजी ऊर्जा मंत्री तथा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
युवा मोर्चाच्या अंतर्गत असलेल्या युवा वारियर्सच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर तालुक्यातील आघार येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बावनकुळे बोलत होते.
खंडणीखोरीत , युवतीवरचे अन्यायात, विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यात एक नंबर असलेल्या तिघाडी सरकारला धडा शिकवू. युवा वारियर्सच्या माध्यमातून १८ ते २५ वयोगटातील अराजकीय युवकांना जोडण्यासाठी दौऱ्यावर आलो असल्याचे मत युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मांडले.यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम ,जि.प.सदस्य मनीषा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दादा जाधव, लकी गिल, नीलेश कचवे ,पोपट लोंढे, नीलेश पाकळे, अनिकेत पाटील, योगेश मैंद, संकेत बावनकुळे, विजय बनसोडे आदी उपस्थित होते. आघार येथील बैठकीनंतर मालेगाव शहरात तीन शाखांचे फलक अनावरण करण्यात आले. मालेगाव जिल्ह्यातर्फे संघटन सरचिटणीस देवा पाटील यांनी स्वागत केले. यावेळी हरिप्रसाद गुप्ता, भरत पोफळे, नंदू तात्या सोयगांवकर, संजय काळे, विजय देवरे, सुधीर जाधव, सुनील शेलार, राहुल पाटील, कुणाल सूर्यवंशी, श्याम गांगुर्डे, धनंजय पवार, पप्पू पाटील, शक्ती सौदे, निखिल सोनार, स्वप्नील भदाणे, योगेश ठाकरे, विशाल नेरकर भूषण शिंदे आदी उपस्थित होते.