निफाडचा पारा ४.८ अंशांवर, राज्यातील निचांकी तपमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:54 PM2018-01-25T12:54:49+5:302018-01-25T13:33:38+5:30

गुरूवारी निफाड येथील कृषी संशोधन केंद्र ,कुंदेवाडी येथील हवामान केंद्रावर ४.८ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तपमानाची नोंद करण्यात आली.

Nifad mercury recorded 4.8 degree mark, the lowest temperature in the state | निफाडचा पारा ४.८ अंशांवर, राज्यातील निचांकी तपमानाची नोंद

निफाडचा पारा ४.८ अंशांवर, राज्यातील निचांकी तपमानाची नोंद

Next

लासलगाव :- जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असल्याने किमान तपमान उणे झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतासह राज्यातील नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत किमान तपमानात घट झाली आहे. गुरूवारी निफाड येथील कृषी संशोधन केंद्र ,कुंदेवाडी येथील हवामान केंद्रावर ४.८ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तपमानाची नोंद करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडीचा तडाखा निफाड तालुक्यामध्ये चांगलाच जाणवू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तपमानामध्ये चांगलीच घट झाली आहे. आज निफाडमध्ये ४.८ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. मागील वर्षी १२ जानेवारी २०१७ रोजी ४ अंश सेल्सिअर किमान तपमानाची नोंद झाली होती .या चालू हंगामात २९ डिसेंबर रोजी ६.५ अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद झाली होती .पुन्हा उष्णता वाढल्यामुळे १० अंशावर किमान तापमानाचा पारा गेला होता. जम्मू-काश्मिर,हिमाचलप्रदेशात बर्फ दृष्टी होत असल्याने किमान तपमान उणे झाल्याने उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे गायब झालेल्या थंडीचे जोरदार आगमन झाले असून मंगळवारी १०.४ अंश सेल्सिअस किमान तपमानाची तर बुधवार रोजी ७ अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद झाली होती आज ४.८ अंश सेल्सिअस किमान तपमान झाल्याने या कडाक्याच्या थंडीत तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिकांनी उब मिळविण्याचा प्रयत्न केला आहे .

या हंगामातले हे सर्वात कमी ४.८ अंश सेल्सिअस किमान तपमान झाल्याने कृषी संशोधन केंद्रातील गहू पिकांवर मोठ्या प्रमाणात दविबंदू जमा झाल्याचे दिसत होते तर या थंडीने हरभरा व गव्हाच्या पिकाला या थंडीचा फायदा होणार आहे. थंडीचा तडाखा अजून जर वाढला तर नुकतीच फुगवन आलेल्या द्राक्षमन्यांना तडे जाण्याची भीती द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली आहे .यामुळे द्राक्षांना मागणी घटते व आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावू लागणार असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे .

Web Title: Nifad mercury recorded 4.8 degree mark, the lowest temperature in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.