सिन्नर : तालुक्यातील ६ गावांसह अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यांच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे वर्षभरात पूर्ण होतील अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे दालनात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या प्रश्नासंदर्भात लाभक्षेत्रातील सर्व पक्षांचे लोकप्रतीनिधी व अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कालव्यांच्या संदर्भात लाभक्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाºयांची एकत्रित बैठक घेण्याची मागणी शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली होती. या बैठकीत बोलताना आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, धरणाच्या डाव्या कालव्यावर सिन्नर तालुक्यातील पाथरे खु, वारेगाव, सायाळे, मलढोण, दुसंगवाडी, कहांडळवाडी या कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागातील १४५६.६५ हेक्टर क्षेत्र येत असून या कालव्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी मिटणार आहे. या कालव्यांची कामे लवकरात लवकर करण्यात यावी, जेणेकरून या दुष्काळी भागातील शेतकºयांना दिलासा मिळेल. ४८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कालव्यांची कामे पूर्ण करण्याच्या व कालवे बंदीस्त पाईप लाईनद्वारे न करता खुल्या पद्धतीने करण्याची सूचना जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिल्या. सद्य स्थितीत धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून कालवे नसल्यामुळे शेतकºयांना पाणी मिळत नाही. सध्याच्या मंजूर प्रकल्पातील खर्चानुसार पारंपरिक कालवेच सरकारला परवडनारे असुन त्यामुळे उपलब्ध निधी नुसार त्यांची कामे तातडीने करण्याच्या सूचना अधिकाºयांना यावेळी नामदार शिवतारे यांनी दिल्या. सबंधित न्यू एशियन कंपनीचे ठेकेदार यांनी वर्षभरामध्ये कालव्यांची कामे पुर्ण करावित अन्यथा त्यांचेवर कारवाई करण्याचा इशारा शिवतारे यांनी यावेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौºयानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार नामदार शिवतारे स्वत: अकोले तालुक्यातील शेतकºयांना भेटणार असून आवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबस्तात कालव्यांची कामे सुरु करण्यात येतील.यावेळी बैठकीस खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार स्नेहलताताई कोल्हे, निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर वर्पे, नानासाहेब शेळके तसेच निळवंडे पाट ङ्क्त पाणी कृती समितीचे पदाधिकारी यांच्यासह अहमदनगरचे अधीक्षक अभियंता श्रीमती अलका अहिरराव, संगमनेरचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल, कार्यकारी अभियंता जगताप तसेच उत्तर महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी हे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
निळवंडे कालव्याची कामे वर्षभरात पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 5:39 PM