निमोणच्या दोन मुली, एका बालिकेला बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:46 PM2020-06-18T12:46:18+5:302020-06-18T12:46:55+5:30
सिन्नर : तालुक्यातील दोडी येथील ५५ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील निमोण तालुका संगमनेर येथे राहणाऱ्या त्यांच्या ३१ आणि ३० वर्षीय दोन्ही मुली आणि १३ वर्षांची बालिकाही कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे.
सिन्नर : तालुक्यातील दोडी येथील ५५ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील निमोण तालुका संगमनेर येथे राहणाऱ्या त्यांच्या ३१ आणि ३० वर्षीय दोन्ही मुली आणि १३ वर्षांची बालिकाही कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे.
सदर दोन्ही मुली वडिलांना भेटण्यासाठी दोडी ता. सिन्नर येथे आल्या होत्या. स्थानिक प्रशासनापासून त्यांनी ही माहिती दडवून ठेवली होती. मात्र तिघींनाही त्रास होवू लागल्याने कोरोना चाचणी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. सिन्नरच्या रु ग्णामुळे शेजारच्या संगमनेर तालुक्यातही कोरोनाचा प्रसार झाला असून नागरिकांनी कोरोना सदृश्य रु ग्णांना भेटतांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यापूर्वी या व्यक्तीचा २७ वर्षीय मुलगाही कोरोना बाधित आढळला आहे. दोडीच्या या ५५ वर्षीय
रु ग्णास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सिन्नर उपजिल्हा रु ग्णालयातून त्यांना नाशिक जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सध्या सिन्नरच्या ग्रामीण रु ग्णालयात दोडी येथील २७ वर्षीय युवक, पाथरे येथील ७६ वर्षांचे आजोबा, कोनांबे येथील ३२ वर्षीय महिला आण िनाशिकच्या भाभानगर येथील ४९ वर्षीय महिला अशा चार कोरोना बाधित रु ग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली.