डांगसौंदाणे : सटाणा- डांगसौंदाणे रसत्यावरील डांगसौदाणे शिवारातील दिगंबर धर्मा बोरसे यांचा सात एकर तर वंदना साहेबराव काकुळते यांचा दोन एकर ऊस जळुन ख़ाक झाला आहे. विजवितरणच्या गलथान कारभारामुळे या दोघा शेतकऱ्यांचे १० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,सटाणा डांगसौंदाने रस्त्यावर एस्सार पेट्रोल पंपाच्या समोर दिगंबर बोरसे यांचे व त्यांच्या कुटुंबियाच्या नावे असलेले बागायती क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी अनुक्रमे दिगंबर बोरसे यांच्या नावावरील १ हेक्टर पत्नी च्या नावे असलेले ८६ आर क्षेत्र तर मुलगा योगेश यांच्या नावे १ हेक्टर क्षेत्र आहे. या संपूर्ण क्षेत्रात बोरसे यांनी आडसाली उसाची लागवड केली असुन आता थोड्याच् दिवसात कारखान्याच्या गाळपास जाणारा हा ऊस आजच्या आगीत संपूर्णपने जळून ख़ाक झाला आहे. तर या उसाला केलेले ठिबक सिंचन ही संपुर्ण पणे जळाले आहे. याच क्षेत्राला लगत असलेला वंदना काकुळते यांचा ही दोन एकर उस जळाल्याने त्यांचे ही चार लाखांचे नुकसान झाले आहे. या ऊसाबरोबर नेटाफेम कंपनीचे ठिबक सिंचन ही संपूर्ण पणे जळाले आहे. बोरसे यांच्या शेतात विजवितरणच्या तारांचे मोठे जाळे आहे. या तारा पूर्ण पणे लोंबकळल्याने बोरसे यांनी विजवितरणच्या स्थानिक कर्मचारी अणि अधिकारीना याची कल्पना ही दिली होती मात्र नेहमीच्या सवयींप्रमाणे स्थानिक अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याने आजचे नुकसान घडून आले आहे. याबाबत शेतकर्यांमधुन संताप व्यक्त केला जात असुन असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी असतांना कुठल्याही शेतकऱ्यांची दखल या अधिकाऱ्याकडून।घेतली जात।नसल्याने विजवितरणच्या अधिकारी कर्मचारी बद्दल मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. आज शेतपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे उद्या कोणाचा जिव गेल्यास याला जबाबदार कोण ?असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे . या नुकसानीची पाहणी विजवितरणच्या स्थानिक अधिकारी कर्मचारी यांनी केली असुन स्थानिक तलाठी आतिश कापड़नीस यांनी महसुल विभागाच्या वरिष्ठाना माहिती देत पंचनामा केला आहे.
नऊ एकर ऊस जळून खाक दहा लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 10:55 PM
डांगसौंदाणे : सटाणा- डांगसौंदाणे रसत्यावरील डांगसौदाणे शिवारातील दिगंबर धर्मा बोरसे यांचा सात एकर तर वंदना साहेबराव काकुळते यांचा दोन एकर ऊस जळुन ख़ाक झाला आहे. विजवितरणच्या गलथान कारभारामुळे या दोघा शेतकऱ्यांचे १० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देडांगसौदाणे : विज वितरणाच्या भोंगळ कारभार