क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना नऊ लाखांचा दंड
By admin | Published: March 15, 2016 12:35 AM2016-03-15T00:35:06+5:302016-03-15T00:47:57+5:30
क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना नऊ लाखांचा दंड
देवळा : फेब्रुवारी महिन्यातील कारवाई ंदेवळा : देवळा तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गत फेब्रुवारी महिन्यात परमिटमध्ये नमूद केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणारी २७ वाहने जप्त करून नऊ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
तहसील कार्यालय आवारात वाळूने भरलेल्या ट्रक्समुळे कार्यालयात जाण्या-येण्यास नागरिकांना जागा राहिली नसल्याने जनतेत चर्चेचा विषय ठरला आहे. उमराणे येथे राष्ट्रीय महामार्गावर चार महिला तलाठ्यांनी सोमवारी अतिरिक्त वाळू भरलेला ट्रक जप्त करून देवळा तहसील कार्यालयात जमा केला आहे. त्यामुळे महिला तलाठ्याच्या कामाचे कौतुक होत आहे.
अवैध वाळू वाहतुकीबाबत आमदार डॉ. राहुल अहेर यांनी कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना जनता दरबारात दिले होते. त्यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसण्यास मदत झाली आहे.
शासनाने साक्री, शिंदखेडा, धुळे आदि ठिकाणी वाळूचे लिलाव सुरू केल्याने येथून नाश्ािंककडे वाळूने भरलेले ट्रक सतत सुरू असतात. अतिरिक्त वाळू भरलेली वाहने पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे. अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी तलाठीवर्गाचे फिरते पथक रात्रीच्या वेळी कार्यरत असते.
महिला तलाठी बी. बी. सावळे, एम. एल. शेळके, एस. एस. देवरे, एस. ए. थेटे यांनी धाडस दाखवून उमराणे येथे महामार्गावर वाळूचा ट्रक अतिरिक्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर दंडाची कारवाई केली.