शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
7
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
8
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
9
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
10
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
11
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
12
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
13
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
14
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
16
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
17
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
18
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
19
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
20
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"

क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना नऊ लाखांचा दंड

By admin | Published: March 15, 2016 12:35 AM

क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना नऊ लाखांचा दंड

 देवळा : फेब्रुवारी महिन्यातील कारवाई ंदेवळा : देवळा तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गत फेब्रुवारी महिन्यात परमिटमध्ये नमूद केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणारी २७ वाहने जप्त करून नऊ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तहसील कार्यालय आवारात वाळूने भरलेल्या ट्रक्समुळे कार्यालयात जाण्या-येण्यास नागरिकांना जागा राहिली नसल्याने जनतेत चर्चेचा विषय ठरला आहे. उमराणे येथे राष्ट्रीय महामार्गावर चार महिला तलाठ्यांनी सोमवारी अतिरिक्त वाळू भरलेला ट्रक जप्त करून देवळा तहसील कार्यालयात जमा केला आहे. त्यामुळे महिला तलाठ्याच्या कामाचे कौतुक होत आहे. अवैध वाळू वाहतुकीबाबत आमदार डॉ. राहुल अहेर यांनी कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना जनता दरबारात दिले होते. त्यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसण्यास मदत झाली आहे. शासनाने साक्री, शिंदखेडा, धुळे आदि ठिकाणी वाळूचे लिलाव सुरू केल्याने येथून नाश्ािंककडे वाळूने भरलेले ट्रक सतत सुरू असतात. अतिरिक्त वाळू भरलेली वाहने पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे. अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी तलाठीवर्गाचे फिरते पथक रात्रीच्या वेळी कार्यरत असते. महिला तलाठी बी. बी. सावळे, एम. एल. शेळके, एस. एस. देवरे, एस. ए. थेटे यांनी धाडस दाखवून उमराणे येथे महामार्गावर वाळूचा ट्रक अतिरिक्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर दंडाची कारवाई केली.