निफाडला पारा आणखी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 06:53 PM2020-01-01T18:53:05+5:302020-01-01T18:55:41+5:30

निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून बुधवारी १ जानेवारी रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ९ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला होता.

Niphad mercury dropped further | निफाडला पारा आणखी घसरला

निफाडला पारा आणखी घसरला

Next
ठळक मुद्दे९ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद

निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून बुधवारी १ जानेवारी रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ९ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला होता.
मंगळवारी (दि.३१) डिसेंम्बर रोजी ११.२ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर गारठून गेले होते. मात्र थंडीने आपला रु द्रावतार वाढवत नेल्याने बुधवारी (दि.१) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ९ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे कडाक्याच्या थंडीने निफाडकरांना गारठून टाकले होते. तालुक्यात उसतोडीसाठी आलेल्या ऊस तोड कामगार, शेतकरी, नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यात दिवसभर गारवा जाणवत होता.
ही थंडी गहू, कांदे पिकांना फायदेशीर ठरणार आहे. मात्र या वाढत जाणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे पडणे, फुगवण कमी होणे, द्राक्षाच्या वेलींना अन्न पुरवठा कमी होणे आदी परिणाम होणार असल्याने द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे.
 

Web Title: Niphad mercury dropped further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.