देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची पुरती वाट लागल्याने या रस्त्यांवरून शेतमालाची व प्रवाशी वाहतूक करणे अवघड बनले आहे. खराब रस्त्यांचे भोग अद्यापही संपत नसल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशी व शालेय विद्यार्थ्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.पूर्व भागातील देवगाव ते नैताळे हा जवळपास नऊ कि.मी.चा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे वाढते साम्राज्य आणि झाडाझुडपांचा पडलेला विळखा यामुळे या रस्त्याने प्रवास करणे अवघड बनले आहे. देवगाव ते कानळद या रस्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. तालुक्याला जवळच्या मार्गाने जोडणाºया या रस्त्यांकडे पदाधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
देवगांव : जनतेने आपले गाºहांणे मांडावे तरी कुणावे.
देवगांव ते देवगांवफाटा, देवगांव ते नैताळे, देवगांव ते धानोरे, देवगांव ते मानोरी,यासारख्या कितीतरी रस्त्यांची हिच अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला पडलेला काटेरी झुडपांचा विळखा यामुळे समोरून येणाºया वाहणाला साईड देने म्हणजे अवघड होऊन बसते. या परीसरात मुबलक पाणी विज आणि बागायती जमीनीमुळे शेतमालाचे ऊत्पादन वाढले. मात्र पिकवलेला माल विक्रि साठी बाजारपेठेत नेण्यासाठी व्यवस्थित रस्तेच नसल्याने अनेकवेळा शेतमालाची वाहने रस्त्यावरच नादुरु स्त होतात. या परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रि साठी लासलगाव, निफाड, पिपंळगाव बसंवत, व नाशिक येथील बाजारपेठेत पाठवतो. मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे हा शेतमाल बाजारपेठेत ऊशिरा पोहचल्याने तो खराब होतो किंवा त्यास पाहिजे त्या प्रमाणात बाजारभाव मिळु शकत नाही. शेतकºयाला शेतमाल उत्तम प्रकारे पिकवता येतो. मात्र खराब रस्त्यामुळे तो वेळेवर विकता येत नाही. या सर्व रस्त्यांचे कामे पुर्ण होणे गरजेचे आहे. संबधीत अधिकारी,पदाधिकारी यांनी रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.