नांदूरवैद्य-: ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोना साथीचे संकट असल्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले. त्यामुळं फिजिकल डिस्टनिसंग आणि शांततेत साधेपणाने निरोप देण्यात आला. यावेळी सात ते आठ भाविकांच्या उपस्थितीत टाळमृदंगाच्या साथीने गणरायाची छोटेखाणी मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेल्या महिलांनी गणरायाचे औक्षण करत मनोभावे पूजा केल्यानंतर मिरवणूक दारणा धरण येथे पोहचली. यानंतर शेवटची सामुहिक आरती झाल्यानंतर ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरण येथे नांदूरवैद्यच्या लाडक्या राजाला गेल्या अकरा दिवसापासून विराजमान झालेल्या गणरायाला आज साश्रुनयनांनी भावपूर्ण निरोप देण्यात आला.
ना ढोलताशा ना भक्तांचा गराडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 5:03 PM
नांदूरवैद्य-: ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोना साथीचे संकट असल्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले. त्यामुळं फिजिकल डिस्टनिसंग आणि शांततेत साधेपणाने निरोप देण्यात आला.
ठळक मुद्देनांदूरवैद्यच्या राजाला भावपूर्ण निरोप : फिजिकल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी