येणाºया काळात नोकºया मिळणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:57 PM2018-02-11T23:57:43+5:302018-02-12T00:00:58+5:30

नाशिक : जगभरात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नोकºयांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत असून, येणाºया काळात रोजगाराचा पर्याय म्हणून नोकºया उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तरुणांना नोकºया मिळविण्यापेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले आहे.

No longer will receive the nozzle in the coming period | येणाºया काळात नोकºया मिळणार नाहीत

येणाºया काळात नोकºया मिळणार नाहीत

Next
ठळक मुद्देमाधव भांडारी : बीबीएनजीच्या उद्यम कौस्तुभ पुरस्कारांचे वितरणउद्योग व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन

नाशिक : जगभरात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नोकºयांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत असून, येणाºया काळात रोजगाराचा पर्याय म्हणून नोकºया उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तरुणांना नोकºया मिळविण्यापेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले आहे.
सातपूर येथे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे (बीबीएनजी) माधव भांडारी यांच्या हस्ते ‘उद्यम कौस्तुभ २०१८’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते उद्योजकांशी संवाद साधत होते. माधव भांडारी म्हणाले, येणाºया काळात अंगभूत गुणवत्तांच्या आधारेच उद्योग व्यवसाय करावा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली ज्ञान संपन्नता ब्राह्मण समाजात असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे यापुढील काळात ज्ञान आणि शेती क्षेत्रात अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याने समाजाने ज्ञान कौशल्याच्या अधारे शेती सुधारणा, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कृषिमाल प्रक्रिया उद्योग क्षेत्राकडे वळून अंतर्गत सहकार्याच्या भावनेतून समाज विकास साधण्याचे आवाहन भांडारी यांनी यावेळी केले. तर पुरस्काराला उत्तर देताना विश्वास चितळे यांनी भारताला दुग्ध उत्पादनात पुन्हा समृद्ध करण्याची गरज व्यक्त केली, तर एन.बी.एच. कुलकर्णी यांनी सध्याच्या काळात बोकाळलेल्या भ्रष्टाचार आणि शिक्षणाचे बाजारीकरण रोखून नवीन पिढी घडविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली.उद्यम कौस्तुभ, जीवन गौरव पुरस्कार प्रदानब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे चितळे उद्योगाचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्यासह एमएमजेसी सल्लागार कंपनीचे संस्थापक मकरंद जोशी, बांधकाम व्यावसायिक विवेक देशपांडे, उद्योजक नितीन केळकर व राजेंद्र बेडेकर यांचा उद्यम कौस्तुभ पुरस्कार २०१८ देऊन सन्मान करण्यात आला. समाजातील उद्योजकांना साहाय्य करणाºया ‘दे आसरा’ या समाजिक संस्थेलाही कौस्तूभ पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर भारत-इस्राइल संबंधांची पायाभरणी करणारे एन.बी.एच. कुलकर्णी यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

Web Title: No longer will receive the nozzle in the coming period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक